‘एक आठवडा महिलांसाठी’ उपक्रम
By admin | Published: August 9, 2016 02:25 AM2016-08-09T02:25:13+5:302016-08-09T02:25:13+5:30
शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने महिला सक्षमीकरण मोहिमेंतर्गत ‘एक आठवडा महिलांसाठी’ हा उपक्र म राबविण्यात येत आहे.
नागोठणे : शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने महिला सक्षमीकरण मोहिमेंतर्गत ‘एक आठवडा महिलांसाठी’ हा उपक्र म राबविण्यात येत आहे. १ ते ७ आॅगस्ट दरम्यान हा उपक्र म प्रत्येक गावात राबविण्यात आला. त्या अनुषंगाने ही मोहीम शनिवारी विभागातील आमडोशी येथे पार पडली. आमडोशी येथील हनुमान मंदिरात त्या निमित्ताने महिलांची विशेष सभा घेण्यात येऊन त्यात उपक्र माची भूमिका स्पष्ट करण्यात आली.
या कार्यक्र माला तहसीलदार दीपक गायकवाड, नायब तहसीलदार बांदिवडेकर, रोहे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शेगडे, पर्यवेक्षिका लखिमले, मंडळ अधिकारी मनोज मोरे, कृषी अधिकारी मढवी, सरपंच एकनाथ ठाकूर आदींसह अंगणवाडी सेविका, शेकडो महिला उपस्थित होत्या. या मोहिमेंतर्गत सातबारा ८ अ उताऱ्यावरील महिलांच्या सबलीकरणासाठी महसूल विभागाकडून व्यापक जनसंपर्क मोहीम, महसूल विभागाशी निगडित प्रश्नांसोबत कृषी, सहकार, बालकल्याण योजना, गावपातळीवर महिलांचे मेळावे, मोहिमेद्वारे महिला खातेदारांसाठी माहिती आदी विषयांबाबतची महत्वपूर्ण माहिती दीपक गायकवाड यांनी महिलांसमोर स्पष्ट केली. यावेळी मान्यवरांचे हस्ते महिलांना सातबारा उताऱ्यांचे वाटप करण्यात आले. गावात बचत गट असून त्याद्वारे महिलांनी सक्षम होण्यासाठी त्याचा वापर करीत बचत गटांद्वारे विविध लघुउद्योग चालू करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. (वार्ताहर)