रुग्णालयातील जैविक कचरा उघड्यावर
By Admin | Published: December 23, 2016 03:25 AM2016-12-23T03:25:15+5:302016-12-23T03:25:15+5:30
उपजिल्हा रुग्णालयातून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावणे, ही जबाबदारी त्या रुग्णालयाची
कर्जत : उपजिल्हा रुग्णालयातून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावणे, ही जबाबदारी त्या रुग्णालयाची आहे. मात्र, हा जैविक कचरा उपजिल्हा रु ग्णालयाच्या आवारात टाकला जात आहे. त्यामुळे रु ग्णालयाच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे, याला जबाबदार कोण? असा प्रश्न समोर येत आहे.
नागरी घनकचरा अधिनियम २००० व जैविक घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी ) नियम १९८८ नुसार रु ग्णालयातून निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावणे, ही जबाबदारी त्या रुग्णालयाची आहे, त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्याची जबाबदारी त्या-त्या रु ग्णालयाची आहे. कर्जत उपजिल्हा रु ग्णालयात निर्माण होणारा कचरा संकलित करून, विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे येथे पाठविला जातो, असे असतानाही कर्जत उपजिल्हा रु ग्णालयात गोळा होणारा कचरा हा दवाखान्याच्या आवारातच असलेल्या शवविच्छेदनगृहाच्या बाजूला टाकला जात आहे, त्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्याचा त्रास रुग्णालयाच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना होत आहे, त्यांचे आरोग्य धोक्यात येत असून, याला जबाबदार कोण? असा प्रश्न या परिसरातील नागरिक विचारत आहेत. याबाबत नागरिकांनी तक्र ारी के ल्यावर माध्यमांना कळताच, दुसऱ्या दिवशी हा जैविक कचरा जाळण्यात आला.
तीन दिवसांपूर्वी उपजिल्हा रु ग्णालयातील कुपोषित मुलांसाठी सुरू केलेल्या बाल उपचार केंद्रास भेट देण्यासाठी आलेल्या आमदार सुरेश लाड यांनी उपजिल्हा रु ग्णालया बरोबर आवाराची पाहणी केली, त्या वेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जैविक कचरा जाळण्यात आल्याचे चित्र स्पष्ट दिसले. त्या ठिकाणी उपस्थित नर्स यांना आमदार सुरेश लाड यांनी हे काय आहे? असा प्रश्न विचारला असता, त्याचे उत्तर त्या देऊ शकल्या नाहीत. याबाबत आमदार लाड यांनी नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)