मुंबई ऊर्जा प्रकल्पाविला विरोध कायम  

By वैभव गायकर | Published: November 18, 2023 01:41 PM2023-11-18T13:41:35+5:302023-11-18T13:42:05+5:30

चिंध्रन ,वलप,कानपोली,हेदुटणे पाठोपाठ टेंभोडे ग्रामस्थ आक्रमक

Oppose to Mumbai Power Project continues | मुंबई ऊर्जा प्रकल्पाविला विरोध कायम  

मुंबई ऊर्जा प्रकल्पाविला विरोध कायम  

पनवेल : केंद्र सरकारच्या माध्यमातून मुंबईच्या उपनगरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मुंबई ऊर्जा प्रकल्पासाठीची 100 किलोमीटर ट्रान्समिशन लाईन टाकण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील 16 गावांतून हा प्रकल्प जात आहे.मात्र हा प्रकल्प जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या जमिनीतून नेला जात असल्याने मोठ्या प्रमाणात प्रकल्पाला विरोध होत आहे.

दि.18 रोजी टेंभोडे ग्रामस्थांनी या प्रकल्पाविरोधात निदर्शन केली. आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वात यावेळी आंदोलन करण्यात आले.या प्रकल्पाविरोधात चिंध्रन ग्रामस्थांनी यापूर्वी आमरण उपोषण पुकारले होते.दहा दिवस हे उपोषण चालल्यानंतर मुंबई ऊर्जा प्रकल्प प्रशासनाने नमती भूमिका घेत शेतकऱ्यांच्या जागेतून टॉवर उभारणार नसल्याचे आश्वासन दिले होते.पुढे  वलप,कानपोली आणि हेदुटणे ग्रामस्थ आणि आज टेंभोडे ग्रामस्थांनी आंदोलन पुकारल्याने मुंबई ऊर्जा प्रकल्पाविरोधात तालुक्यात संताप व्यक्त होताना दिसून येत आहे.

Web Title: Oppose to Mumbai Power Project continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.