अलिबाग : कोकणातील प्रस्तावित असणाऱ्या केमिकल झोनला विरोध करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. सरकारच्या या अन्यायकारक धोरणाविरोधात समाजातून मोठी शक्ती निर्माण व्हावी यासाठी जनजागृती केली जात आहे. विविध आंदोलने, गाव बैठका, मोर्चे, लाँगमार्च, धरणे अशा पातळ््यांवर सरकारला घेरण्याची तयारी जिल्ह्यात सुरु झाली असून त्याचे पडसाद तळ कोकणातही पाडण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून येते.आधीच्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने कोकणात एकही केमिकलचा कारखाना निर्माण केला जाणार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र भाजपा सरकारने कोकणात केमिकल झोन निर्माण करण्याचाच चंग बांधला आहे. पेट्रोलियम केमिकल अॅण्ड पेट्रोकेमिकल इन्व्हेस्टमेंट रिजन असे नाव केंद्र सरकारने दिले आहे. भारतात तीस समुद्र किनारे हे केमिकल झोनसाठी आंदण देण्यात आले असून ती जागा खासगी उद्योगासाठी राखून ठेवण्यात येणार आहे. केमिकल झोनमुळे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय हानी होणार असल्याचे उल्का महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.प्रत्येकी २५० चौ.कि.मी.च्या असणाऱ्या विभागातील १०० चौ.कि.मी. इतकी जागा प्रत्यक्ष उत्पादनाच्या प्रक्रियेसाठी दिली जाणार आहे. त्यातील प्रत्येक विभागामध्ये विविध सेझ, फ्रिटेड झोन, इंडस्ट्रीयल पार्क आणि निर्यात क्षेत्र राहणार आहे. उत्पादकांना विविध परवानग्यांमध्ये सूट दिली जाणार आहे. सेझ आणि डीएमआयसी (दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडॉर) मध्ये देण्यात येणाऱ्या सवलतींची खैरात केली जाणार आहे. कोकणातील शेतकरी, कष्टकरी, मच्छीमार यामुळे उद्ध्वस्त होणार आहेत. आमच्या आंदोलनामध्ये विविध पर्यावरणप्रिय संघटना, काही सामाजिक संघटना, सर्वसामान्य नागरिकही सामील होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)१या विरोधात आवाज उठविण्यासाठी सर्वहारा जनआंदोलनाच्या प्रमुख उल्का महाजन यांनी २ आॅक्टोबर २०१५ पासून जन आंदोलन छेडले आहे. त्याचाच भाग म्हणून गावागावात बैठका, सभा घेऊन जनतेमध्ये जागृती निर्माण केली जात असल्याचे उल्का महाजन यांनी सांगितले. २सुमारे एक महिन्यापूर्वी माणगाव येथे विविध चळवळीत काम करणाऱ्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे तालुक्यातील तहसीलदार कार्यालयावर धडक दिली जात आहे. २ आॅक्टोबरला त्याची सुरुवात पेण तालुक्यापासून झाली आहे.02 आॅक्टोबरला त्याची सुरुवात पेण तालुक्यापासून झाली. ३ आॅक्टोबरला पनवेल, ४ आॅक्टोबर उरण, ५ आॅक्टोबरला अलिबागच्या तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ आॅक्टोबरला मोर्चाचे आयोजन केले आहे.
जिल्ह्यात केमिकल झोनला विरोध
By admin | Published: October 05, 2015 12:35 AM