नाल्यावरील स्लॅबला विरोध

By admin | Published: December 11, 2015 01:20 AM2015-12-11T01:20:38+5:302015-12-11T01:20:38+5:30

शहरालगत असणाऱ्या आणि वरसे ग्रामपंचायत हद्दीतील सातमुशी नाल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. या नाल्यावर स्लॅब टाकल्यास भुवनेश्वर विभागातील शांतीनगर

Opposition to the slab on the Nallah | नाल्यावरील स्लॅबला विरोध

नाल्यावरील स्लॅबला विरोध

Next

रोहा : शहरालगत असणाऱ्या आणि वरसे ग्रामपंचायत हद्दीतील सातमुशी नाल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. या नाल्यावर स्लॅब टाकल्यास भुवनेश्वर विभागातील शांतीनगर, एकता नगर, आदर्शनगर, हरिओम, प्रियदर्शनी, मिलन या इमारतींमधील रहिवाशांना पाण्याचा सामना करावा लागणार आहे. हा नाला कायमस्वरूपी उघडा ठेवण्यात यावा तसेच नाल्याची रूंदी कायम ठेवण्यात यावी यासाठी येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी रायगड, तहसीलदार रोहा, गटविकास अधिकारी तसेच सरपंच आणि ग्रामसेवक वरसे यांना निवेदन दिले आहे.
वरसे ग्रामपंचायत हद्दीतील शांतीनगर, एकता नगर, आदर्शनगर, हरिओम, प्रियदर्शनी, मिलन या इमारती पावसाळ्यात तुंबून राहणाऱ्या पाण्यामुळे बाधित होत असतात, याचा फटका येथील रहिवाशांना बसत आहे. सनसिटी बिल्डरने त्यांच्या स्वत:च्या फायद्यासाठी सातमुशी नाल्यावर स्लॅब टाकण्यास सुरु वात केली आहे. या नाल्यावर स्लॅब टाकल्यास आम्हा नागरिकांच्या वसाहती पावसाळ्यात पूर्णपणे बुडण्याची भीती आहे. हा नाला कायमस्वरूपी उघडा ठेवण्यात यावा तसेच मूळ नाल्याची रूंदी कायम ठेवण्यात यावी.
सातमुशी नाल्यावर स्लॅब टाकण्यास स्थानिक रहिवाशांचा विरोध असल्याचे तेथील रहिवासी नंदकुमार राक्षे, एस. पी. सोनावणे, भास्कर कदम यांनी सांगितले आहे.
सातमुशी नाल्याच्या प्रश्नांबाबत संबंधितांकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे. या विभागातील पाण्याचा पावसाळ्यात पूर्णत: निचरा होत नसल्याचे ३-४ वर्षांपूर्वी बें्रडा कॉम्प्लेक्स येथून पर्यायी नाला बांधण्यात आला आहे. परंतु हा नाला अतिशय उथळ असून या नाल्याचा प्रवाह देखील सातमुशी नाल्याकडे वळविल्याने पावसाचे पाणी तसेच बारमाही सांडपाणी सातमुशी नाल्यातूनच जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
हा नाला अरूंद करण्यास सनसिटी बिल्डरला परवानगी का देण्यात आली, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Opposition to the slab on the Nallah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.