कुख्यात गुन्हेगार नंदू पवारला तडीपारीचे आदेश
By admin | Published: September 14, 2015 11:36 PM2015-09-14T23:36:37+5:302015-09-14T23:36:37+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून महाड शहराच्या परिसरात चोऱ्या, घरफोड्या करणारा नंदू पवार (३२, रा. विरेश्वर तलावाजवळ, महाड) यास रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्याच्या
महाड : गेल्या अनेक वर्षांपासून महाड शहराच्या परिसरात चोऱ्या, घरफोड्या करणारा नंदू पवार (३२, रा. विरेश्वर तलावाजवळ, महाड) यास रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्याच्या आदेशावर उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले.
नंदू पवार याच्यावर चोरी, घरफोडी तसेच बलात्कार यासारखे १४ हून अधिक गुन्हे शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. वारंवार गुन्हे करण्याच्या त्याच्या सवयीमुळे कायदेशीर बंधन राहावे याकरिता त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत होती. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याचे हे उद्योग सुरूच होते. त्यामुळे महाडकर नागरिकांसह पोलीसदेखील हैराण झाले होते. त्याच्या या गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी नंदू पवार याची रायगड जिल्ह्यातून तडीपारी करावी. याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांकडे प्रलंबित होता. यावर नुकतीच सुनावणी होवून त्याच्या तडीपारीचा आदेश वाढण्यात आला. नंदू पवारच्या तडीपारीमुळे शहरातील नागरिकांनी तसेच पोलिसांनीही सुस्कारा सोडला आहे. (वार्ताहर)