जीवनविद्या मिशनचे ‘अवयवदान अभियान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 10:43 PM2019-07-26T22:43:53+5:302019-07-26T22:44:06+5:30

कृतज्ञता महोत्सव : १७ हजार प्रतिज्ञापत्रे घेतली भरून

Organizational Mission of the Life Sciences Mission | जीवनविद्या मिशनचे ‘अवयवदान अभियान’

जीवनविद्या मिशनचे ‘अवयवदान अभियान’

Next

कर्जत : जीवनविद्या मिशनतर्फे दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त ‘कृतज्ञता महोत्सव’ आयोजित करण्यात येतो, जीवनविद्या मिशन गेली ६३ वर्षे विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवत आहे. याच उपक्रमांतर्गत मिशनने ‘अवयवदान अभियान’ हाती घेतले असून, येत्या दोन वर्षांत लाखो लोकांना अवयवदानाबाबत जागृत केले व १७ हजार प्रतिज्ञापत्र भरून घेतली.

शासनाच्या ग्राहक संरक्षण अभियानाशी संलग्न होत जीवनविद्या मिशन २०१७ पासून जनतेत ग्राहक जनजागृती करत आहे. याचाच एक भाग म्हणून या कृतज्ञता महोत्सवामध्ये अन्नामधील भेसळ व वजनमापातील त्रुटी कशा ओळखाव्या? याचे प्रात्यक्षिक दाखवणारा ग्राहक जनजागृतीचा स्टॉल लावण्यात आला आहे. पर्यावरण जागृतीबाबत माहिती देणारे स्टॉल यात घनकचरा नियंत्रणाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येते, तसेच जीवनविद्या मिशन या संस्थेला २०१६ पासून ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्रातील ६० गावे दत्तक घेऊन त्यांचा मिशनमार्फ त सर्वांगिण विकास करण्यात येत आहे.

या महोत्सवास महाराष्ट्रभरातून दररोज आठ ते दहा हजार लोक उपस्थिती लावत आहेत. मिशनचे आजीव विश्वस्त व प्रबोधनकार प्रल्हाद वामनराव पै हे लोकांच्या मानसिकतेत बदल घडविणाऱ्या अनेक छोट्या व सोप्या युक्त्या रोजच्या व्याख्यानामधून देतात, ज्या लोकांना आवडतात व उपयुक्त वाटतात.

व्यसन, अंधश्रद्धा दूर करून लोकांमध्ये वैचारिक बदल घडविण्याचे यशस्वी कार्य जीवनविद्या मिशन करत आहे. जीवनविद्या मिशन ही सामाजिक व शैक्षणिक संस्था असल्यामुळे वरील सामाजिक उपक्रम तसेच विद्यार्थी, युवक व बालके यांच्यासाठी मिशनमार्फ त विनामूल्य आयोजित करण्यात येणाºया उपक्रमांचे मार्गदर्शन करणारे स्टॉल या महोत्सवात आहेत. या महोत्सवात प्रबोधनकार प्रल्हाद पै यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Organizational Mission of the Life Sciences Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.