सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 06:09 AM2017-08-12T06:09:12+5:302017-08-12T06:09:12+5:30
रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीतील १३ तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता रायगड पोलीस दल आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०१७’ चे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीतील १३ तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता रायगड पोलीस दल आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०१७’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेस शासन नियुक्त रायगड जिल्हा अग्रणी बँक आॅफ इंडिया आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा सहयोग लाभला आहे. या स्पर्धेत सर्व पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी करुन घेवून ही स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी केले आहे.
रायगड जिल्हा पोलिसांच्या गुन्हे परिषदेत, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या हस्ते रायगड पोलीस दल आणि लोकमत आयोजित ‘सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०१७’ च्या प्रवेश अर्जाचे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी पारसकर बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, पोलीस उप अधीक्षक(गृह) राजेंद्र दंडाळे, जिल्ह्यातील सर्व उप विभागीय
पोलीस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी
तसेच लोकमतचे कर्मचारी उपस्थित होते.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज शनिवारपासून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये उपलब्ध राहाणार आहेत. ही स्पर्धा रायगड पोलीस कार्यक्षेत्रातील १३ तालुक्यांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता मर्यादित आहे. स्पर्धेच्या सहभागाकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या देखाव्यात राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन व संरक्षण, स्वच्छता आणि ध्वनी
प्रदूषण नियंत्रणविषयक जनजागृतीपर देखाव्यांना स्पर्धेकरिता विचारात
घेतले जाणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सामाजिक
कार्य याचाही समावेश निवडीच्या निकषामध्ये आहे.
निवडीचे निकष
स्पर्धेत सहभागी होणाºया गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धा सहयोगींचा माहितीविषयक बॅनर प्रदर्शित करणे बंधनकारक राहणार आहे. परीक्षक मंडळ व आयोजकांचा निर्णय अंतिम व मंडळांना बंधनकारक राहाणार आहे.
गरज भासल्यास स्पर्धेचे नियम व अटी बदलण्याचे अधिकार आयोजकांनी राखून ठेवले आहेत. स्पर्धेच्या परीक्षणाची पद्धती आणि पारितोषिकांची घोषणा लवकरच ‘लोकमत’ मधून करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज शनिवारपासून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये उपलब्ध राहणार आहेत. ही स्पर्धा रायगड पोलीस कार्यक्षेत्रातील १३ तालुक्यांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता मर्यादित आहे.