तंबाखूविरोधी सप्ताहाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:29 AM2018-06-01T01:29:10+5:302018-06-01T01:29:10+5:30

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा संचालनालय, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्र मांतर्गत अलिबागमधील जिल्हा रु ग्णालयाच्यावतीने जागतिक तंबाखू

Organizing a Tobacco Week | तंबाखूविरोधी सप्ताहाचे आयोजन

तंबाखूविरोधी सप्ताहाचे आयोजन

Next

अलिबाग : जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा संचालनालय, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्र मांतर्गत अलिबागमधील जिल्हा रु ग्णालयाच्यावतीने जागतिक तंबाखू विरोधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. गुरुवारपासून सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे.
तंबाखूचे सेवन केल्याने जास्तीत जास्त नागरिकांना तोंडाचा कॅन्सर होतो. दाताची निगा राखण्यासाठी नागरिकांनी दिवसातून दोन वेळा दात घासणे आवश्यक आहे. काही खाल्ल्यास चुळ भरणे गरजेचे आहे. जेणेकरून दात दुखणे, दातांमध्ये कीड निर्माण होणे असे आजार टाळण्यास मदत होणार आहे.
तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास टाळण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी म्हणून जनजागृती करणे आवश्यक आहे, असे डॉ. अतुल देशमुख यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्यामार्फत तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली. उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शपथ घेऊन कार्यक्र मांची सांगता केली.
याप्रसंगी अधिसेविका मोरे, दंतशल्यचिकित्सक डॉ. ऋ तुजा माळी, दंतशल्यचिकित्सक डॉ. प्रियंका पिंगळे, दंतशल्यचिकित्सक डॉ. प्रथमेश बुधे, दंतआरोग्यतज्ज्ञ जयप्रकाश वाघ, दंत तंत्रज्ञ शारिफ शेख, दंत सहाय्यक लिताक पिंगळे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्र म समुपदेशक दिनेश मुसळे, सामाजिक कार्यकर्ते हितेश जाधव, जिल्हा रुग्णालयातील सर्व परिचारिका व प्रशिक्षणार्थी परिचारिका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Organizing a Tobacco Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.