पेणमधील शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन
By admin | Published: March 5, 2017 02:55 AM2017-03-05T02:55:10+5:302017-03-05T02:55:10+5:30
पेण शिक्षण महिला समितीच्या शिशुविकास मंदिर, सु.वि.देव विद्यालय, सु.वि.देव माध्यमिक विद्यालय तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये विविध उपक्रम पार पडले.
पेण : पेण शिक्षण महिला समितीच्या शिशुविकास मंदिर, सु.वि.देव विद्यालय, सु.वि.देव माध्यमिक विद्यालय तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये विविध उपक्रम पार पडले. संस्थेच्या शिशुविकास मंदिरात विविध गुणदर्शन कार्यक्रम व प्रदर्शन साजरे झाले. यामध्ये निसर्गातील विविध घटकांचा वापर योग्य रितीने करण्यात आला होता. बलूतेदार रचना व कळसुत्री बाहुल्यामार्फत स्वच्छता अभिमान हे खास आकर्षण ठरले. सु.वि.देव विद्यालयात ‘ज्ञानरचनावाद’ हा दृष्टीकोन ठेवून उत्तम रित्या प्रदर्शन भरविण्यात आले होते. जुन्या वस्तूंचा पुर्नवापर हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हस्तकला प्रदर्शन मांडण्यात आले होते.
सु.वि.देव माध्यमिक विद्यालयात मराठी दिन व विज्ञान दिन साजरा करण्यात आला. संस्थेच्या इंग्रजी माध्यम शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागाने विज्ञानजत्रा भरवली होती. तर प्राथमिक विभागाने मराठी कविता वाचन, शब्दकोडी, नाट्यवाचन, विनोद, म्हणी व आकर्षक रित्या बनविलेले शैक्षणिक साहित्य यांच्या सहाय्याने मराठी दिन साजरा केला. या सर्व उपक्रमांसाठी सस्थेच्या अध्यक्षा, कार्यकारणी मंडळ, सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांचा समावेश होता. (वार्ताहर)