‘आमचा गाव - आमचा विकास’ रॅली
By admin | Published: July 30, 2016 04:28 AM2016-07-30T04:28:01+5:302016-07-30T04:28:01+5:30
शासनाच्या १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत आमचा गाव-आमचा विकास या योजनेची माहिती देण्याकरिता देवळे ग्रामपंचायतीच्या वतीने एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
पोलादपूर : शासनाच्या १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत आमचा गाव-आमचा विकास या योजनेची माहिती देण्याकरिता देवळे ग्रामपंचायतीच्या वतीने एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.
शासनाची आमचा गाव - आमचा विकास ही योजना राज्यभरात सुरू झाली आहे. या कार्यक्र मातून ग्रामीण भागातील समस्यांचा अभ्यास करून विकास आराखडा बनविण्यासाठी लोकसहभाग वाढावा, जनजागृती व्हावी यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत लहुलसे, दाभिळ, करंजे, हलदुले, केवनाळे आणि देवळे येथे रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरु वात गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करु न करण्यात आली. या कार्यक्र मांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा बनविणे, महिला सभा घेऊन विकासात्मक योजना राबवणे, प्रत्येक गावाचा विकास आराखडा तयार करणे आदींचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्र माच्या निमित्ताने ग्रामपंचायतीच्यावतीने मशाल फेरी, सीमा फेरी आणि जनजागृती रॅली काढण्यात आली. आमचा गाव - आमचा विकास कार्यक्र मानुसार शनिवारी (३० जुलै) ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन केले आहे.