श्रीवर्धन : उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती शस्त्रक्रिया व इतर सेवासुविधा उपलब्ध करण्यात याव्यात व रुग्णालयात रुग्णांवर उपचार देण्यास नकार देण्याऱ्या डॉक्टरांविरोधात कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी श्रीवर्धनमधील कृष्णा रटाटे, मनोज गोगटे, सुनील पवार, जुनेद दुस्ते, शोहेब हमदुल्ले, प्रीतम श्रीवर्धनकर यांनी तहसीलदार सचिन गोसावी यांच्याकडे निवेदन दिले. निवेदनात रुग्णालयाच्या विविध त्रुटी व सोईसुविधा संदर्भात मागणी करण्यात आली आहे.
उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती शस्त्रक्रिया ५ जुलै, २०२०पासून बंद आहेत. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर प्रसूती शस्त्रक्रिया श्रीवर्धनला होऊ शकत नाही, असे सांगत आहेत, त्यामुळे तुम्ही प्रसूती शस्त्रक्रियेसाठी अलिबाग किंवा महाडला घेऊन जा, असे उत्तर दिले जात आहे. श्रीवर्धन ते महाड किंवा अलिबाग हे अंतर जास्त आहे. त्यामुळे संबधित ठिकाणी पोहोचण्यासाठी खूप वेळ जात आहे. शिवाय त्या ठिकाणच्या सरकारी दवाखान्यात उपचार मिळण्याची शक्यता कमी आहे. पर्यायाने गर्भवती माता व तिच्या बाळाच्या जीवितास धोका निर्माण होत आहे.महाड व अलिबाग येथील खासगी दवाखान्यात वैद्यकीय शुल्क भरमसाट घेतले जात आहे, त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे.
सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जनतेला वैद्यकीय सेवा मिळणे गरजेचे आहे. मात्र, संबंधित उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना योग्य सेवासुविधा उपलब्ध होत नाहीत. एक वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्यास प्रभारी पदभार सांभाळणाºया अधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. मात्र, संबधित अधिकारी व कर्मचाºयास आपल्या कर्तव्याचा विसर पडलेला दिसून येत आहे. असे निवेदनात म्हटले आहे. प्रसूती शस्त्रक्रियेसाठी किती रुग्णांना महाड व अलिबाग येथे पाठवण्यात आले आहे? याची चौकशी करण्यात यावी व दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी.
श्रीवर्धन व म्हसळा या दोन्ही तालुक्यांसाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकाºयांची नेमणूक करण्यात यावी. उपजिल्हा रुग्णालय या नावाप्रमाणे किमान श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील रुग्णांना तरी चांगली सेवा दिली जावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.ंकोरोना काळात सेवा बंद ठेवणाºया दवाखान्यांवरती तात्काळ कारवाई करावी. व त्यांचं व्यावसायिक परवाने रद्द करावेत.- प्रीतम श्रीवर्धनकर, नगरसेवक, श्रीवर्धन
उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरअभावी गर्भवती महिलांचे हाल होत आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे, त्याची तात्काळ नोंद घेण्यात यावी अन्यथा जनतेचा उद्रेक होईल, त्यास रुग्णालय प्रशासन जबाबदार राहील.- जुनेद दुस्ते, श्रीवर्धन
माज्या मुलीला झालेला त्रास इतरांना होऊ नये यासाठी मी हॉस्पिटलच्या मनमानी कारभारा विरोधात आरोग्य मंत्र्याला निवेदन दिले आहे.- कृष्णा रटाटे, रहिवाशी, श्रीवर्धन
श्रीवर्धनमधील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे. आज नागरिकांना उपजिल्हा रुग्णालयातून योग्य सुविधा दिल्या जात नाहीत ही बाब निंदनीय आहे. गर्भवती महिलांचे अतोनात हाल होत आहे..- मनोज गोगटे, श्रीवर्धन
कृष्णा रटाटे यांच्या दोन्ही मुलींविषयी उपजिल्हा रुग्णालयात चुकीची कृती करण्यात आहेत. ही बाब गंभीर आहे.- सुनील पवार, श्रीवर्धन
उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच्या रिक्त पदाविषयी वरिष्ठांशी चर्चा झालेली आहे. त्यानुसार, लवकरच रिक्त पदे भरली जातील. श्रीवर्धनमधील जनतेला दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.- जितेंद्र सातनाक, नगराध्यक्ष,श्रीवर्धन