नरेश पवार, वडखळ : पेणमधील गणेश मूर्ती असल्याचे सांगून अनेक जण इतर ठिकाणी बनविलेली मूर्ती देऊन भक्तांची फसवणूक करत असल्याचे समोर आले. त्यानंतर पेणच्या गणेशमूर्तींना जीआय मानांकनाचा प्रस्तावही पाठविण्यात आला आणि मागील वर्षी जीआय मानांकनही मिळाले. आता पेणच्या गणेशमूर्तींची हुबेहूब नक्कल करून फसविणाऱ्यांना चाप बसणार आहे. नक्कल केल्यास ते कायद्याचे उल्लंघन ठरू शकते, तसेच यासाठी तीन वर्षे तुरुंगवास, दोन लाख दंड ठोठावला जाऊ शकतो.
व्यावसायिकांचा आनंद द्विगुणित
मानांकन मिळविण्यासाठी देशभरातील ३५ उत्पादनांचे प्रस्ताव आले होते. त्यापैकी १३ उत्पादने महाराष्ट्रातील होती. यात पेणच्या गणेशमूर्तीस मान्यता मिळाल्याने पेणच्या गणेशमूर्ती व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.