सावित्री पुलावर १८ कोटींची टोलवसुली

By admin | Published: July 10, 2015 12:16 AM2015-07-10T00:16:15+5:302015-07-10T00:16:15+5:30

मुुंबई-गोवा महामार्गावरील महाडनजीक सावित्री पुलाजवळील टोल बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतल्यामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले असले

Over 18 crore toll collection on Savitri Bridge | सावित्री पुलावर १८ कोटींची टोलवसुली

सावित्री पुलावर १८ कोटींची टोलवसुली

Next

महाड : मुुंबई-गोवा महामार्गावरील महाडनजीक सावित्री पुलाजवळील टोल बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतल्यामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले असले तरी ३ कोटी ५४ लाख रुपये खर्च झालेल्या या सावित्री पुलासाठी गेल्या पंधरा वर्षांत वाहनचालकांकडून अठरा कोटी ६० लाख ६ हजार रुपयांची टोलवसुली करण्यात आल्याचे वास्तव पुढे आले आहे.
महामार्गावर सावित्री नदीवर हा पूल बांधल्यानंतर १५ जानेवारी २००१ पासून या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने बसवलेल्या टोलनाक्यावर २ जुलै २०१५ पर्यंत १९ कोटी ६० लाख रुपयांचा पथकर वसूल करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हा टोलनाका बंद करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती, मात्र संबंधित ठेकेदारावर महामार्ग विभागाने कुठलीही ठोस कारवाई केली नव्हती. त्यानंतरही आजपर्यंत ही टोलवसुली सुरूच होती. मात्र हा टोल २ जुलै २०१५ पासून बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नियमितपणे प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी सुस्कारा सोडला आहे. (वार्ताहर)

Web Title: Over 18 crore toll collection on Savitri Bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.