देशातील सर्वात मोठ्या जेएनपीए सेझमध्ये भुखंडासाठी ४० टक्के रकमेहून अधिक बोली, १४ भुखंडाचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 08:13 PM2023-12-14T20:13:36+5:302023-12-14T20:13:53+5:30

मधुकर ठाकूर  उरण : देशातील सर्वात मोठ्या २७७ हेक्टर क्षेत्रावरील जेएनपीए सेझच्या ५६५ कोटींच्या गुंतवणूकीनंतर ई-निविदा आणि लिलावाव्दारे यशस्वी ...

Over 40 percent bid for plots in country's largest JNPA SEZ, allocation of 14 plots | देशातील सर्वात मोठ्या जेएनपीए सेझमध्ये भुखंडासाठी ४० टक्के रकमेहून अधिक बोली, १४ भुखंडाचे वाटप

देशातील सर्वात मोठ्या जेएनपीए सेझमध्ये भुखंडासाठी ४० टक्के रकमेहून अधिक बोली, १४ भुखंडाचे वाटप

मधुकर ठाकूर 

उरण: देशातील सर्वात मोठ्या २७७ हेक्टर क्षेत्रावरील जेएनपीए सेझच्या ५६५ कोटींच्या गुंतवणूकीनंतर ई-निविदा आणि लिलावाव्दारे यशस्वी ठरलेल्या १४ भुखंडाचे वाटप करण्यात आले आहे.भाडेपट्ट्याने दिल्या जाणाऱ्या या भुखंडासाठी राखीव किमतीपेक्षा  ४० टक्के जास्त बोलीवर देण्यात आली असल्याची माहिती जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

जेएनपीएचे बंदर आधारित ऑपरेशन मल्टी -प्रॉडक्ट असे देशातील सर्वात मोठे स्पेशल इकॉनॉमिक झोन (जेएनपीए सेझ) तयार करण्यात येत आहे.जेएनपीए सेझच्या धोरणात्मक जमीन वाटप आणि औद्योगिक विकास याबाबत माहिती देण्यासाठी गुरुवारी जेएनपीएने मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष उन्मेष वाघ, जेएनपीए सेझचे वरिष्ठ अधिकारी नितीन बोरवणकर, वरिष्ठ मार्केटिंग मॅनेजर अंबिका सिंग व इतर अधिकारी उपस्थित होते.

 जेएनपीएच्या मालकीच्या २७७ हेक्टर क्षेत्रावरील उभारण्यात येत असलेल्या सेझमध्ये ५६५ कोटींच्या गुंतवणूकीनंतर अत्यावश्यक पायाभूत सोयीसुविधांचा विकास पुर्ण केला आहे.आत्तापर्यत ३१ युनिटसना सेझ भुखंडाचे वाटप करण्यात आले आहे.यामध्ये नऊ युनिट आणि एक फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोन (एफटीडब्ल्यूझेड) आधीच कार्यरत आहे.हे ऑपरेशनल युनिट्स वेअरहाउसिंग, फूड प्रोसेसिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये विभागलेले आहेत.सेझ जमिनीच्या ६० वर्षांच्या भाडेपट्ट्यासाठी पारदर्शक ई-निविदा कम ई-लिलाव प्रक्रिया गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. भाडेपट्ट्यावरील १६३ हेक्टर जमिनींपैकी ६२ हेक्टर जमीन याआधीच ३१ युनिट्सना देण्यात आली आहे.तर  ११६ एकरसाठी नुकत्याच झालेल्या ई-लिलावात २१ बोलीदारांनी १५ भूखंडांसाठी बोली सादर केली. विशेष म्हणजे राखीव किंमतीपेक्षा वरच्या प्लॉट्सच्या बोलीमध्ये एकूण १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.इनव्हेस्टमेंट फॉर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सने सेझमधील एक एकर जमीनसाठी तीन कोटींचा दर निश्चित केला आहे.मात्र त्यानंतरही तर काही भूखंडांसाठी राखीव किंमतीपेक्षा ४० टक्के पेक्षा जास्त बोली प्राप्त झाली असल्याची माहिती जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी पत्रकार परिषदेतून दिली. ई-लिलावानंतर जेएनपीएने १४ यशस्वी बोलीदारांना १४ भूखंडांच्या वाटपासाठी लेटर्स ऑफ इंटेंट (LOI) जारी केले आहेत.त्यासाठी ११० कोटींहून अधिक प्रिमियमची रक्कम जमा झाली आहे.यामध्ये देशातील वेलस्पन वन आणि फाइन ऑरगॅनिक्स सारख्या आघाडीच्या उद्योगांचा समावेश असल्याची माहिती जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

Web Title: Over 40 percent bid for plots in country's largest JNPA SEZ, allocation of 14 plots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.