शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

वनराई बंधा-यांतून पाणीटंचाईवर मात, पाच हजार बंधारे बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 3:01 AM

भूगर्भातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ करण्यासाठी बंद पडलेल्या वनराई बंधारे योजना रायगड जिल्हा परिषद आता पुन्हा सुरू करणार आहे

अलिबाग : भूगर्भातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ करण्यासाठी बंद पडलेल्या वनराई बंधारे योजना रायगड जिल्हा परिषद आता पुन्हा सुरू करणार आहे. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पाच हजार वनराई बंधारे बांधण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक संस्था, लोकसहभागाची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्माण होणाºया पाणीटंचाईवर काही अंशी मात करता येणार आहे.रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने पाऊस पडतो. त्यामुळे तेथील नद्या, नाले, तलाव दुथडी भरून वाहत असतात. जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेमुळे हे पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते. पाणी थांबण्याची प्रक्रि या होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पडलेल्या पावसाचा जिल्ह्याला म्हणावा तसा उपयोग होत नाही. परिणामी मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. काही ठिकाणी तर नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते.यावर उपयायोजना म्हणून पाणी अडवा पाणी जिरवा अशी योजना तत्कालीन सरकारने आखली होती. त्या योजनेच्या माध्यमातून छोट्या-मोठ्या ठिकाणच्या नद्या, नाल्यांवर वनराई बंधारे बांधण्यात आले होते. २00४ मध्ये जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास भोसले यांनी वनराई बंधाºयांची संकल्पना प्रभावीपणे जिल्ह्यामध्ये राबविल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याने पाणीटंचाई काही प्रमाणात कमी झाली होती.कालांतराने २00८ पासून वनराई बंधारे बांधण्याची मोहीम थंडावत गेली होती. ती आता पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर यांनी सुरू केला आहे. आॅक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यात ७८ वनराई बांधरे बांधण्यात आले आहेत.वनराई बंधाºयांद्वारे पावसाळ्यात वाहणाºया नदी, नाल्यातील पाणी थांबविले जाते. हे पाणी जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत उपयोगात येते. या पाण्यावर शेतकºयांना भाजीपाला पिकासाठी पाणी उपलब्ध होते. २00८ पासून ही मोहीम थंडावत गेली. मागील वर्षी अगदी थोड्याप्रमाणात वनराई बंधारे बांधले होते. पूर्णपणे लोकसहभागातून बांधण्यात येणाºया वनराई बंधाºयांच्या कामासाठी सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, एनजीओ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यावलकर आंबेपूर येथे एका कार्यक्र मासाठी गेले होते. तेथे त्यांनी सागाव येथील वनराई बंधाºयाचे प्रात्यक्षिक पाहिले. त्यांनी ही संकल्पना रायगड जिल्ह्यात नव्याने राबविण्याचे ठरवले. लोकसहभागातून रायगड जिल्ह्यात पाच हजार वनराई बंधारे बांधण्याचे लक्षांक देण्यात आले आहे. बंधारे बांधण्यासाठी आवश्यक असणाºया बॅगा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या माध्यमातून मिळणार आहेत. पूर्वी ही योजना कृषी विभागाकडे होती, ती आता पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाकडून सक्षमपणे राबविली जाणार आहे, असे जिल्हा पाणी व स्वच्छता अभियान विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी सांगितले.

टॅग्स :Damधरण