पनवेलमध्ये बेवारस मृतदेहांची होतेय अवहेलना, एकाच चितेवर चार मृतदेह जाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 02:11 AM2019-06-27T02:11:34+5:302019-06-27T02:42:20+5:30

पनवेल महानगरपालिकेकडून बेवारस मृतदेहांची अवहेलना सुरू असल्याचा प्रकार बुधवारी निदर्शनास आला आहे. एकाच चितेवर चार मृतदेह जाळण्यात आले.

Overcrowding of dead bodies in Panvel, four bodies were burnt on one chest | पनवेलमध्ये बेवारस मृतदेहांची होतेय अवहेलना, एकाच चितेवर चार मृतदेह जाळले

पनवेलमध्ये बेवारस मृतदेहांची होतेय अवहेलना, एकाच चितेवर चार मृतदेह जाळले

Next

- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली  - पनवेल महानगरपालिकेकडून बेवारस मृतदेहांची अवहेलना सुरू असल्याचा प्रकार बुधवारी निदर्शनास आला आहे. एकाच चितेवर चार मृतदेह जाळण्यात आले. या प्रकारामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पनवेल परिसरातून मुंबई-गोवा, पुणे, एनएच ४ बी, द्रुतगती त्याचबरोबर पनवेल-सायन महामार्ग जातात. तसेच इतर राज्य महामार्गाचाही समावेश होतो.

पनवेलजवळून उपनगरीय तसेच इतरही रेल्वे मार्ग जातात. यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून दररोज शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात येतात. बºयाचदा काही मृतदेहाची ओळख पटत नाही. अपघातात मृतदेह छिन्नविछिन्न झाल्याने ओळख पटवणेही अवघड होते. काहींचे वारस सापडत नाहीत. त्यामुळे काही मृतदेह तसेच शवागृहात पडून राहतात. पनवेल येथे शवागृह नसल्यामुळे ते वाशी येथे ठेवले जातात. तेथे मृतदेहाच्या नातेवाइकांची दोन महिने वाट पाहिली जाते. त्यानंतर महापालिका या मृतदेहाची विल्हेवाट लावते. या अगोदर नगरपालिका असताना देखील गुजराती स्मशानभूमीत खड्डे करून पुरले जात असत.

महानगरपालिका झाल्यापासून अमरधाम स्मशानभूमीत वायू प्रज्वलित शववाहिनीत बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावली जात असत. यासाठी एका मृतदेहास दोन हजार रु पये महापालिका रोटरी क्लब यांना देत असे; परंतु गेल्या दोन वर्षांपासून सुमारे साडेतीन लाख रु पयांचे बिल थकले आहे. ते बिल महापालिका आयुक्तांकडे पाठवले; पण अद्याप बिल मिळाले नसल्याने बेवारस मृतदेह जाळण्यास नकार दिल्याचे समजते.

सद्यस्थितीमध्ये महापालिका बेवारस मृतदेह गुजराती स्मशानभूमी येथे जाळले जातात. एका वेळी एकाच मृतदेहावर अंत्यविधी करणे गरजेचे असताना एकावर एक चार मृतदेह ठेवून चिता पेटवली जात आहे. बुधवारी पनवेल येथील आठ, खारघरमधील दोन तर रेल्वे पनवेलकडून दोन असे १२ मृतदेहावर एकावर एक असे चार ठेवून अंत्यविधी करण्यात आला. महापालिका मरणानंतरही यातना देत आहे. महानगरपालिकेच्या या गलथान कारभाराविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अशा प्रकारचे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यावी व बुधवारी झालेल्या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मृतदेह अवहेलनेच्या घटनेची पुनरावृत्ती
पनवेल नगरपालिका असतानाही एकाच खड्ड्यात बारा बेवारस मृतदेह पुरण्यात आल्याची घटना २0 नोव्हेंबर २0१४ रोजी उघडकीस आली होती.
नगरपालिकेचे तेच कर्मचारी महापालिकेत काम करतात. आताही परिस्थिती वेगळी नाही. अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. सोन्या मारुतीवर जबाबदारी ढकलून मोकळे होतात.

बुधवारी एकावर एक चार बेवारस मृतदेह जाळल्याने आणखी किती दिवस महापालिका अवहेलना करणार आहे, असा पनवेलकरांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

एका वेळी एकच मृतदेह आम्ही चितेवर जाळत असतो; परंतु सोन्या मारुती यांनी एकाच वेळी अनेक मृतदेह आणल्याने जाळण्याबाबत समस्या येत आहेत. यापुढे एका वेळी एकाच मृतदेहावर अंत्यविधी केला जाईल. रोटरी क्लब यांचे बिल थकले आहे ही वस्तुस्थिती आहे. लवकरच बिल त्यांना अदा केले जाणार आहे.
- शैलेश गायकवाड,
आरोग्य निरीक्षक, पनवेल महापालिका

Web Title: Overcrowding of dead bodies in Panvel, four bodies were burnt on one chest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.