शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पनवेलमध्ये बेवारस मृतदेहांची होतेय अवहेलना, एकाच चितेवर चार मृतदेह जाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 2:11 AM

पनवेल महानगरपालिकेकडून बेवारस मृतदेहांची अवहेलना सुरू असल्याचा प्रकार बुधवारी निदर्शनास आला आहे. एकाच चितेवर चार मृतदेह जाळण्यात आले.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली  - पनवेल महानगरपालिकेकडून बेवारस मृतदेहांची अवहेलना सुरू असल्याचा प्रकार बुधवारी निदर्शनास आला आहे. एकाच चितेवर चार मृतदेह जाळण्यात आले. या प्रकारामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.पनवेल परिसरातून मुंबई-गोवा, पुणे, एनएच ४ बी, द्रुतगती त्याचबरोबर पनवेल-सायन महामार्ग जातात. तसेच इतर राज्य महामार्गाचाही समावेश होतो.पनवेलजवळून उपनगरीय तसेच इतरही रेल्वे मार्ग जातात. यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून दररोज शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात येतात. बºयाचदा काही मृतदेहाची ओळख पटत नाही. अपघातात मृतदेह छिन्नविछिन्न झाल्याने ओळख पटवणेही अवघड होते. काहींचे वारस सापडत नाहीत. त्यामुळे काही मृतदेह तसेच शवागृहात पडून राहतात. पनवेल येथे शवागृह नसल्यामुळे ते वाशी येथे ठेवले जातात. तेथे मृतदेहाच्या नातेवाइकांची दोन महिने वाट पाहिली जाते. त्यानंतर महापालिका या मृतदेहाची विल्हेवाट लावते. या अगोदर नगरपालिका असताना देखील गुजराती स्मशानभूमीत खड्डे करून पुरले जात असत.महानगरपालिका झाल्यापासून अमरधाम स्मशानभूमीत वायू प्रज्वलित शववाहिनीत बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावली जात असत. यासाठी एका मृतदेहास दोन हजार रु पये महापालिका रोटरी क्लब यांना देत असे; परंतु गेल्या दोन वर्षांपासून सुमारे साडेतीन लाख रु पयांचे बिल थकले आहे. ते बिल महापालिका आयुक्तांकडे पाठवले; पण अद्याप बिल मिळाले नसल्याने बेवारस मृतदेह जाळण्यास नकार दिल्याचे समजते.सद्यस्थितीमध्ये महापालिका बेवारस मृतदेह गुजराती स्मशानभूमी येथे जाळले जातात. एका वेळी एकाच मृतदेहावर अंत्यविधी करणे गरजेचे असताना एकावर एक चार मृतदेह ठेवून चिता पेटवली जात आहे. बुधवारी पनवेल येथील आठ, खारघरमधील दोन तर रेल्वे पनवेलकडून दोन असे १२ मृतदेहावर एकावर एक असे चार ठेवून अंत्यविधी करण्यात आला. महापालिका मरणानंतरही यातना देत आहे. महानगरपालिकेच्या या गलथान कारभाराविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.अशा प्रकारचे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यावी व बुधवारी झालेल्या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.मृतदेह अवहेलनेच्या घटनेची पुनरावृत्तीपनवेल नगरपालिका असतानाही एकाच खड्ड्यात बारा बेवारस मृतदेह पुरण्यात आल्याची घटना २0 नोव्हेंबर २0१४ रोजी उघडकीस आली होती.नगरपालिकेचे तेच कर्मचारी महापालिकेत काम करतात. आताही परिस्थिती वेगळी नाही. अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. सोन्या मारुतीवर जबाबदारी ढकलून मोकळे होतात.बुधवारी एकावर एक चार बेवारस मृतदेह जाळल्याने आणखी किती दिवस महापालिका अवहेलना करणार आहे, असा पनवेलकरांनी प्रश्न उपस्थित केला आहे.एका वेळी एकच मृतदेह आम्ही चितेवर जाळत असतो; परंतु सोन्या मारुती यांनी एकाच वेळी अनेक मृतदेह आणल्याने जाळण्याबाबत समस्या येत आहेत. यापुढे एका वेळी एकाच मृतदेहावर अंत्यविधी केला जाईल. रोटरी क्लब यांचे बिल थकले आहे ही वस्तुस्थिती आहे. लवकरच बिल त्यांना अदा केले जाणार आहे.- शैलेश गायकवाड,आरोग्य निरीक्षक, पनवेल महापालिका

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेल