नियंत्रण कक्षातून मिळणार ऑक्सिजन, आयसीयू बेडची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 07:49 PM2020-09-21T19:49:08+5:302020-09-21T19:49:14+5:30
या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
रायगड : सरकारी आणि खासगी कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन, आयसीयू बेडची माहिती आता नागरिकांना सहज उपलब्ध हाेणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक तहसीलदार कार्यालयात बेडबाबत सनियंत्रण करण्यात येणार आहे. या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून काेराेनाचा प्रकाेप वाढला आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेड उपलब्ध हाेत नसल्याने रुग्णांची गैरसाेय हाेऊन उपचाराबाबत हेळसांड हाेत आहे. काेणत्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजन आणि आयसीयू बेड किती आहेत. याबाबत सर्वसामान्याना माहिती मिळत नव्हती. याबाबत प्रशासनाची चांगलीच दमछाक हाेत हाेती. बेडचे सनियंत्रण करण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रत्येक तहसीलदार कार्यालय सज्ज ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी फाेन केल्यावर बेडच्या उपलब्धतेबाबत माहिती मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची चांगलीच साेय हाेणार आहे.
तहसील कार्यालय, अलिबाग-02141-222054, तहसील कार्यालय, पेण-02143-252036, तहसील कार्यालय, मुरुड-02144-274026, तहसील कार्यालय, पनवेल-022-27452329, तहसील कार्यालय, उरण-022-27222352, तहसील कार्यालय, कर्जत-02148-222037, तहसील कार्यालय, खालापूर-02192-275048, तहसील कार्यालय, माणगाव-02140-262632, तहसील कार्यालय, तळा- 7066069317, तहसील कार्यालय, रोहा-02194-232232, तहसील कार्यालय, पाली-02142-242665, तहसील कार्यालय, श्रीवर्धन-7249579158, तहसील कार्यालय, म्हसळा-02149-232224, तहसील कार्यालय, महाड-02145-222142, तहसील कार्यालय, पोलादपूर-02191-240026, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग-02141-222118