Oxygen Leakage: मोठी दुर्घटना टळली! उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टॅंकमधून गळती; १५७ रुग्ण सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 04:37 PM2021-04-27T16:37:02+5:302021-04-27T16:43:56+5:30
पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकला जोडलेला वाल लिक झाल्याने काही प्रमाणात ऑक्सिजन गळती झाली आहे.
अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली - पनवेल शहर तसेच ग्रामिण भागातील कोवीड रुग्णांना जिवनदान देणा-या पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंक लिक झाल्याने काही प्रमाणात गॅस गळती झाली . वेळीच दक्षता घेत संबंधित सुरक्षा एजन्सिंना प्राचरण करण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकला जोडलेला वाल लिक झाल्याने काही प्रमाणात ऑक्सिजन गळती झाली आहे . या रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटमध्ये त्रिस्तरिय सुरक्षा असल्याने वेळीच वायु गळती लक्षात आली . त्यानुसार सुरक्षा यंत्रणेला प्राचरण करण्यात आले. दुरुस्तीचे काम वेळीच सुरु करण्यात आले आहे . उपजिल्हा रुग्णालयात सद्य परिस्थितीत १५७ रुग्ण उपचार घेत आहेत . ऑक्सिजन गळती झाल्याची माहीती मिळताच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रुग्णालयाला भेट दिली . त्याचबरोबर पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख ,तहसिलदार विजय तळेकर , प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली . सर्व बाबी सुरक्षीत असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
नाशिकमध्ये काय घडलं होतं?
नाशिक येथे डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकी असून, त्यातील गॅस रिफील करताना पाइप लाइनचा व्हॉल्व्ह तुटल्याने ऑक्सिजनची गळती झाली. या दुर्घटनेत तब्बल २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.