कर्जत : तालुक्यातील पाथरज येथील डोंगरपाडा भागात जून २०१७मध्ये वळण बंधारा कर्जत कृषी विभागाने बांधला होता. त्या ठिकाणी कामे नित्कृष्ट होत असल्याचे ग्रामस्थ सांगत असतानादेखील कृषी विभागाने नेमलेल्या ठेकेदाराकडून वळण बंधाºयाचे काम करताना दर्जा राखण्याचा प्रयत्न केला नाही. पाच लाख रुपये खर्चून जलयुक्त शिवार अभियानात बांधलेला वळण बंधारा वाहून गेला असून, त्याखाली असलेल्या शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा कृषी विभाग या कामाची चौकशी करणार का? याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.पाथरज या महसुली गावात कृषी विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या महसुली गावातील डोंगरपाडा भागात एक वळण बंधारा आदिवासी आश्रमशाळेच्या मागे जून २०१७मध्ये बांधला होता. त्या भागात शेतकरी फार कमी प्रमाणात असल्याची तक्र ार स्थानिक पातळीवर वळण बंधारा मंजूर केला त्या वेळी शेतकरी करीत होते. मात्र, कृषी विभागाकडे शेतकºयांच्या वळण बंधाºयांच्या नित्कृष्ट कामाबद्दल मोठ्या प्रमाणात तक्र ारी केल्या होत्या; परंतु कृषी विभागाने कोणत्याहीतक्र ारीकडे लक्ष दिले नसल्याने शेवटी तो वळण बंधारा वाहून जाण्याचा प्रसंग ओढवला आहे.कृषी विभागाने त्या ठिकाणी कामे करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराला वाचविण्याचा सातत्याने प्रयत्न केला असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक तक्रारी होऊनदेखील कृषी विभाग करीत असलेल्या दुर्लक्षामुळे पाच लाख खर्चून बांधलेला वळण बंधारा वाहून जाऊन नुकसान झाले.डोंगरपाडा आदिवासी आश्रमशाळेच्या मागे असलेल्या जमिनीमधील शेतात पाणी वळवून घेण्यासाठी बांधलेला वळण बंधारा वादाचा भोवºयात सापडला आहे. कारण तो वळण बंधारा नित्कृष्ट कामामुळे पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्या वळण बंधाºयामधून सुरुवातीला पाणीगळती होत होती आणि त्यामुळे आजूबाजूच्या शेतकºयांनी वळण बंधाºयामधील पाणी त्या ठिकाणी पाणी वळण्यासाठी बांधलेल्या दरवाजातून वळून शेतात जाण्याची शक्यता कमी होती. त्याकडे कृषी विभागाने लक्ष दिले नाही, त्यामुळे तो वळण बंधारा गेला आठवडाभर सुरू असलेल्या पावसाच्या पाण्यात वाहून गेला.सुरुवातीला त्या वळण बंधाºयाच्या तळाशी ज्या ठिकाणी पाणीगळती होत होती, त्या ठिकाणी पहिले भगदाड पडले आणि आता तर त्या ठिकाणी किमान १० मीटर लांबीचा नाला तयार झाला आहे. त्या ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेले सिमेंट बांधकाम तोडून टाकले तर पाच लाख खर्चून वळण बंधारा बांधला होता का? हा प्रश्न निर्माण होईल. त्या वळण बंधाºयाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले सिमेंट, रेती, दगड हे खालील भागात असलेल्या शेतात वाहून गेले असून त्यामुळे त्या भागातील शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कर्जत तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाला गालबोट लागले आहे.
पाथरज येथील बंधारा गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 2:11 AM