कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील भात कापणी हंगाम जोरात चालू आहे; परंतु शेतीचे काम करणाऱ्या मजुरांअभावी भात कापणीची कामे खोळंबली आहेत.भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाºया तालुक्यातील भातशेती व्यवसाय सध्या स्थितीला कमी होऊन ६०-७० टक्क्यांवर आला आहे. याला कारण तालुक्यातील औद्योगीकरण झपाट्याने होत आहे. तसेच तरुण पिढी शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त बाहेरगावी जात असल्यामुळे शेती व्यवसायाकडे पाठ फिरवली जात आहे. तसेच नैसर्गिक अनियमितता यामुळे होणारे नुकसान ही बाबसुद्धा त्रासदायक ठरत आहे, त्यामुळे शेती हंगामासाठी मजुरांची कमतरता भासत आहे.पूर्वी शेतीकामासाठी हांदा पद्धत होती. हांदा म्हणजे एकमेकांच्या कामाला जाणे त्यामुळे शेतीची सर्व कामे वेळेत आणि व्यवस्थित होत होती; परंतु सध्या काळात हांदा प्रकार संपुष्टात आला आहे. शेतमालकाला वेळेवर कामासाठी माणसे मिळत नाहीत. शेतजमीन कमी झाल्याने यंत्राचा उपयोग करता येत नाही.भविष्यात शेतीकामासाठी यंत्राचीच गरज भासणार आहे. त्या दृष्टीने शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजना या अंतर्गत अनुदानावर शेतकºयांनी भात कापणी, मळणीयंत्र घेऊन या योजनांचा लाभ घ्यावा. तसेच शासनाच्या शेतीकामाच्या अडचणींवर मात करता येईल.- श्याम धर्माधिकारी, तालुका कृषी अधिकारी, अलिबाग
शेतमजुरांअभावी भातशेतीची कामे खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:57 PM