मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून संपूर्ण भात शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. खार आंबोली, शिघरे व अन्य भागातील बरीचशी शेती पाण्याखाली गेली आहे. तालुक्यात ३९०० हेक्टरवर भातशेती केली जाते. यापैकी किमांन दोन हजार हेक्टर क्षेत्रात पाणी साचल्याने भात शेतीवर मोठे संकट कोसळले आहे.आदिवासी वाडीवर जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या छोटा पूल सुद्धा वाहून गेल्याने येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. आगारदांडा येथील दिघी पोर्टजवळील एका वळणावर पाणी साचल्याने रोहा मार्गाने जाणाऱ्या सर्व गाड्यांची वाहतूक काही तासासाठी बंद करण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. आतापर्यंत मुरुड तालुक्यात २२६३ मिलिमीटर एवढा पाऊस झाला असून विहिरी, तलाव व नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
मुरुडमध्ये भातशेती पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 11:26 PM