पद्मदुर्ग जागर कार्यक्रम

By admin | Published: December 24, 2016 03:21 AM2016-12-24T03:21:15+5:302016-12-24T03:21:15+5:30

मुरूड शहराच्या समोरील समुद्रात कासा खडकावरच्या शिवकालीन पद्मदुर्गावर कोकण कडा मित्रमंडळाने सुरू केलेला जागर

Padmadurg Jagar Program | पद्मदुर्ग जागर कार्यक्रम

पद्मदुर्ग जागर कार्यक्रम

Next

अलिबाग : मुरूड शहराच्या समोरील समुद्रात कासा खडकावरच्या शिवकालीन पद्मदुर्गावर कोकण कडा मित्रमंडळाने सुरू केलेला जागर कार्यक्रम २४ व २५ डिसेंबर रोजी होत आहे. या निमित्ताने २४ रोजी सकाळी रायगडहून शिवपालखी मिरवणूक निघणार आहे. या भव्य कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन कोकण कडा मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी केले आहे.
स्वच्छतेच्या निमित्ताने पद्मदुर्गची मोहीम सुरू झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही पद्मदुर्गचा जागर करण्यासाठी २४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता रायगड ते पद्मदुर्ग शिवपालखी मिरवणूक निघणार आहे. चित्त दरवाजा रायगड पालखी आरंभ, पाचाड, नाते, लाडवली, नातेखिंड, छ. श्री शिवाजी चौक महाड, मंडळाचे कार्यालय, सुरेश पवार यांचे निवासस्थान, केंबुर्ली, वहुर, दासगाव, लोणेरे, माणगाव, इंदापूर, तळे, मुरूड नगरपरिषद अशा मार्गाने ही शिवपालखी पद्मदुर्ग किल्ल्यावर जाणार आहे. २५ डिसेंबर रोजी पद्मदुर्ग जागर
कार्यक्रमासाठीही उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन प्रमुख अलिबाग येथील संदीप मित्रमंडळाचे अध्यक्ष व या मोहिमेचे संपर्क प्रमुख संदीप वाघपंजे यांनी केले आहे. २५ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते ९ या वेळेत पद्मदुर्गकडे जाण्यासाठी खोरा बंदरातून बोटींची व्यवस्था नगरपरिषदेने केली आहे. स. १० वा गडपूजन व पद्मदुर्ग जागरचा शुभारंभ नगराध्यक्षा स्नेहा पाटील, शिवसेना शहर प्रमुख प्रवीण भायदे आदींच्या हस्ते होणार आहे.

Web Title: Padmadurg Jagar Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.