पद्मदुर्ग किल्ल्यावरील तोफेची चोरी
By admin | Published: December 15, 2015 01:48 AM2015-12-15T01:48:54+5:302015-12-15T01:48:54+5:30
पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे गेली अनेक वर्षे पद्मदुर्ग कासा किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. पद्मदुर्ग हा किल्ला मुरूड समुद्र किनाऱ्यापासून पाच कि.मी दूर असून, येथे बोटीने
आगरदांडा : पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे गेली अनेक वर्षे पद्मदुर्ग कासा किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. पद्मदुर्ग हा किल्ला मुरूड समुद्र किनाऱ्यापासून पाच कि.मी दूर असून, येथे बोटीने पोहोचण्यास ३५ मिनिटांचा कालावधी लागतो, असे असूनदेखील ऐतिहासिक तोफ चोरट्यांनी चोरून नेली आहे.
या किल्ल्यावर पुरातत्त्व खात्याचा कोणतीही व्यक्ती नियमित हजर नसल्यानेच चोरी झाल्याचा आरोप केला जात आहे. ६० किलो वजनाची ही तोफ असून, आज घडीला याची किंमत लाखो रुपयांवर वर जाऊ शकते. तोफेची चोरी झाल्याची फिर्याद पुरातत्त्व खात्याचे निरीक्षक शैलेंद्र कांबळे यांनी मुरूड पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुरूड पोलीस निरीक्षक दिगंबर
सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. संतोष गुरव करीत आहेत. (वार्ताहर)