रॅप साँगच्या माध्यमातून मांडा परिसरातील ‘खड्ड्यांच्या व्यथा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:34 AM2019-07-29T01:34:25+5:302019-07-29T01:34:49+5:30
नागरिकांना आवाहन : म्युज फाउंडेशनचा अनोखा उपक्रम
ठाणे : ‘नेमेचि येतो पावसाळा, नेमेचि पडतात खड्डे’ अशी शहरांतील परिस्थिती असून प्रशासनाकडे वारंवार खड्ड्यांच्या व्यथा मांडूनही त्यावर कायमचा तोडगा निघत नाही. त्यामुळे ठाण्यातील म्युज फाउंडेशनने मुंबई, ठाणेकरांना रॅप साँगच्या माध्यमातून आपापल्या विभागांतील खड्ड्यांची समस्या मांडण्याचे आवाहन केले आहे. हे रॅप साँग सोशल मीडियाच्या माध्यमातून ही संस्था प्रशासनापर्यंत पोहोचवणार आहे.
पावसाळा आला की, दरवर्षी रस्त्यांवर खड्डे पडतात. या खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनाही घडतात. परंतु, या खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची प्रशासनाला जाग का येत नाही, असा सवाल करत ‘म्युज’ने गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील अनोखा उपक्रम राबवला आहे. सध्या रॅप संस्कृती वाढत चालली आहे. त्यामुळे या रॅपचा आधार घेत शहरवासीयांनी आपल्या विभागातील खड्ड्यांची गाºहाणी मांडण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. दोन दिवसांपूर्वी हा उपक्रम ‘म्युज’ने सुरू केला असून, दोन दिवसांत ठाणे, मुंबईहून त्यांना पाच रॅप साँग्ज प्राप्त झाले आहेत. हे रॅप साँग नागरिकांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ‘रॅप द होल चॅलेंज’ असा टॅग केल्यावर, त्यांचे रॅप साँग्ज पालिका प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांना याबाबतचा जाब विचारला जाणार आहे. रॅप साँग्जचे व्हिडीओ टिष्ट्वटरवर आम्ही पोस्ट केले असून त्याला पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तरदेखील दिले आहे. परंतु, त्यांची उत्तरे समाधानकारक नसल्याचे म्युज फाउंडेशनचे संस्थापक निशांत बंगेरा यांनी सांगितले.
हे रॅप साँग्ज कोणत्याही भाषेत पाठवण्याची नागरिकांना मुभा आहे. दरवर्षीच खड्डे पडून त्यावर तात्पुरती मलमपट्टी करणाºया पालिका प्रशासनाला अनोख्या पद्धतीने कानपिचक्या दिल्या जात आहेत. गेल्यावर्षी ‘म्युज’ने ‘मेरा खड्डा महान’ हा उपक्रम राबविला होता.
मोठ्या खड्ड्यांचा जो फोटो काढेल, त्याला पारितोषिक देण्यात आले होते. या उपक्रमात १०० जणांनी खड्ड्यांचे फोटो पाठवले होते. खड्ड्यांवरून आंदोलने करण्यापेक्षा हा मार्ग वेगळा असून प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न या अनोख्या उपक्रमातून केला जात आहे. ठाणे शहरात एक हजार खड्डे असून ते तातडीने दुरु स्त करण्याचे आश्वासन ‘म्युज’ला पालिका प्रशासनाने दिले होते. परंतु, या आश्वासनाला पालिकेने वाटाण्याच्या अक्षता लावल्या असल्याने रॅप साँग्जचा पर्याय
निवडला असल्याचे ‘म्युज’तर्फे सांगण्यात आले.