शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

रॅप साँगच्या माध्यमातून मांडा परिसरातील ‘खड्ड्यांच्या व्यथा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 1:34 AM

नागरिकांना आवाहन : म्युज फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

ठळक मुद्देपावसाळा आला की, दरवर्षी रस्त्यांवर खड्डे पडतात.

ठाणे : ‘नेमेचि येतो पावसाळा, नेमेचि पडतात खड्डे’ अशी शहरांतील परिस्थिती असून प्रशासनाकडे वारंवार खड्ड्यांच्या व्यथा मांडूनही त्यावर कायमचा तोडगा निघत नाही. त्यामुळे ठाण्यातील म्युज फाउंडेशनने मुंबई, ठाणेकरांना रॅप साँगच्या माध्यमातून आपापल्या विभागांतील खड्ड्यांची समस्या मांडण्याचे आवाहन केले आहे. हे रॅप साँग सोशल मीडियाच्या माध्यमातून ही संस्था प्रशासनापर्यंत पोहोचवणार आहे.

पावसाळा आला की, दरवर्षी रस्त्यांवर खड्डे पडतात. या खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनाही घडतात. परंतु, या खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची प्रशासनाला जाग का येत नाही, असा सवाल करत ‘म्युज’ने गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील अनोखा उपक्रम राबवला आहे. सध्या रॅप संस्कृती वाढत चालली आहे. त्यामुळे या रॅपचा आधार घेत शहरवासीयांनी आपल्या विभागातील खड्ड्यांची गाºहाणी मांडण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. दोन दिवसांपूर्वी हा उपक्रम ‘म्युज’ने सुरू केला असून, दोन दिवसांत ठाणे, मुंबईहून त्यांना पाच रॅप साँग्ज प्राप्त झाले आहेत. हे रॅप साँग नागरिकांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ‘रॅप द होल चॅलेंज’ असा टॅग केल्यावर, त्यांचे रॅप साँग्ज पालिका प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांना याबाबतचा जाब विचारला जाणार आहे. रॅप साँग्जचे व्हिडीओ टिष्ट्वटरवर आम्ही पोस्ट केले असून त्याला पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तरदेखील दिले आहे. परंतु, त्यांची उत्तरे समाधानकारक नसल्याचे म्युज फाउंडेशनचे संस्थापक निशांत बंगेरा यांनी सांगितले.हे रॅप साँग्ज कोणत्याही भाषेत पाठवण्याची नागरिकांना मुभा आहे. दरवर्षीच खड्डे पडून त्यावर तात्पुरती मलमपट्टी करणाºया पालिका प्रशासनाला अनोख्या पद्धतीने कानपिचक्या दिल्या जात आहेत. गेल्यावर्षी ‘म्युज’ने ‘मेरा खड्डा महान’ हा उपक्रम राबविला होता.मोठ्या खड्ड्यांचा जो फोटो काढेल, त्याला पारितोषिक देण्यात आले होते. या उपक्रमात १०० जणांनी खड्ड्यांचे फोटो पाठवले होते. खड्ड्यांवरून आंदोलने करण्यापेक्षा हा मार्ग वेगळा असून प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न या अनोख्या उपक्रमातून केला जात आहे. ठाणे शहरात एक हजार खड्डे असून ते तातडीने दुरु स्त करण्याचे आश्वासन ‘म्युज’ला पालिका प्रशासनाने दिले होते. परंतु, या आश्वासनाला पालिकेने वाटाण्याच्या अक्षता लावल्या असल्याने रॅप साँग्जचा पर्यायनिवडला असल्याचे ‘म्युज’तर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRainपाऊसthaneठाणेRaigadरायगड