‘रंग दे महाराष्ट्र’ अभियानांतर्गत रंगवल्या शाळांच्या भिंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:48 AM2018-04-29T00:48:02+5:302018-04-29T00:48:02+5:30

रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल

The painted schools wall under the 'Rang De Maharashtra' campaign | ‘रंग दे महाराष्ट्र’ अभियानांतर्गत रंगवल्या शाळांच्या भिंती

‘रंग दे महाराष्ट्र’ अभियानांतर्गत रंगवल्या शाळांच्या भिंती

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल, तर गावात एकोपा असणे आवश्यक आहे. गाव एक झाले तर काहीही साध्य करता येऊ शकते. सामाजिक एकोपा हीच खरी परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे, असा विश्वास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी माणगाव तालुक्यातील मुठवली गावातील ग्रामस्थांमध्ये जागविला आहे. या वेळी ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक उपस्थित होते.
ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यातील निवडक गावातील कामांची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा या पथकाने केली. सकाळी मुठवली ग्रामस्थांशी सर्व अधिकाºयांनी संवाद साधला. या वेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, प्रांताधिकारी ए. आर. देगावकर, तहसीलदार ऊर्मिला पाटील, गटविकास अधिकारी खेडकर, उपविभागीय कृषी अधिकारी येवले तसेच स्वदेस फाउंडेशचे तुषार इनामदार, ग्राम सामाजिक परिवर्तक लहू दोलताडे यांच्यासह ग्रामस्थ महिला, पुरु ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रह्मण्यम यांनी गावात विविध उद्योग व्यवसाय करणाºया कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. या वेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना सूर्यवंशी म्हणाले की, ‘गाव करी ते राव न करी’ अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणेच गाव एकत्र आल्यास, हवा तो विकास शक्य आहे. त्यासाठी शासनाची यंत्रणा सहयोग करेल. गावच्या शाळेचा विकास करा. त्यासाठी ग्रामस्थांनी योगदान द्या. हे योगदान आपल्या मुलांच्या विकासासाठी असून भविष्याची मोठी गुंतवणूक ठरेल. गावकºयांनी मिळून गावात नियमित स्वच्छता अभियान राबवावे, जेणेकरून स्वच्छतेची सवय मुलांच्या अंगी बाणावेल.
ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम यांनी गावकºयांनी ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान हे गावकरी आणि शासन यांनी एकत्र येऊन तयार केलेले विकासाचे नवे मॉडेल ठरावे व त्याची सुरु वात रायगड जिल्ह्यात व्हावी, असे चांगले काम करावे, असे आवाहन केले.

जिल्हाधिकारी बनले चित्रकार
ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर उपस्थितांनी गावातील जि.प. शाळेच्या रंगकामात सहभाग दिला. या वेळी शाळेच्या भिंती रंगवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सेवाभावी कार्यकर्त व जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सचे विद्यार्थी गावात आले होते. त्यांच्या मदतीने शाळेचे रंगकाम सुरु होते. ‘रंग दे महाराष्ट्र’या अभियानांतर्गत मुठवली येथील शाळेच्या भिंती शनिवारी रंगवण्यात आल्या. हे रंगकाम एरव्हीच्या रंगकामापेक्षा वेगळे होते. शालेय विद्यार्थ्यांना अधिक आकलन व्हावे, यासाठी भिंतींवर शैक्षणिकचित्रे काढण्यात आली. अभियानात स्वत: जिल्हाधिकारी सूर्यवंशी आणि ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम हे ही सहभागी झाले होते. दुपारनंतर या पथकाने सुधागड तालुक्यातील महागाव व नवघर या गावांतील कामांची पाहणी करून ग्रामस्थांशी संवादही साधला.

Web Title: The painted schools wall under the 'Rang De Maharashtra' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.