पालीला वाहतूक कोंडीचा विळखा
By admin | Published: January 24, 2017 05:55 AM2017-01-24T05:55:57+5:302017-01-24T05:55:57+5:30
अष्टविनायक क्षेत्रापैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत वाहतूक कोंडीची समस्या बिकट आहे. अरु ंद रस्ते, वाहतुकीच्या
पाली : अष्टविनायक क्षेत्रापैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत वाहतूक कोंडीची समस्या बिकट आहे. अरु ंद रस्ते, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, रस्त्याजवळील बांधकामे व अवैध्य पार्किंग यामुळे पालीत कायम वाहतूक कोंडी होते. परिणामी पादचारी, विद्यार्थी व भाविकांची प्रचंड गैरसोय होते. यामुळे स्थानिकांकडून पर्यायी रस्त्याची मागणी होत आहे. वाहतूक सुरळीत करतांना पोलीस व देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांची मोठी दमछाक होत आहे.
येथील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रोज शेकडो भाविक येतात. अनेक भाविक मोटार किंवा मोठ्या लक्झरी बसेसमधून येतात. येथील अरु ंद रस्त्यांमुळे समोरु न वाहने आल्यास या मोठ्या वाहनांना जाण्यास मार्ग मिळत नाही. तसेच अरु ंद वळणावरु न या मोठ्या वाहनांंना जातांना अडचण येते. परिणामी सर्वच चौकांमध्ये वाहतूक कोंडी होते. काही वाहने नाएन्ट्रीमधून प्रवेश करतात त्यामुळे समोरील वाहनास मार्ग काढता येत नाही. रस्त्याच्या कडेला अनेक अवैध पार्क केलेल्या दुचाकी व मोटार यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. रस्त्याच्या बाजुला असलेली बांधकामे, टपऱ्या व काही घरांचे व दुकांनाचे बाहेर आलेले पत्रे यामुळे देखिल वाहतुकीस अडथळा येतो. रस्त्यावर आलेल्या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडसर येतो. या सर्व कारणांमुळे पालीत वाहतूक कोंडीची समस्या बिकट झाली आहे. येथील जुने एसटी स्टँन्ड (महाकाली मंदीर), हनुमान मंदीर, बाजारपेठ, गांधी चौक, बल्लाळेश्वर मंदीर, ग.बा. वडेर हायस्कूल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.(वार्ताहर)