भेळीव-सावे शाळेची दुरवस्था, प्रशासनाकडे केली दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 03:01 AM2017-10-28T03:01:45+5:302017-10-28T03:01:54+5:30

पाली : रायगड जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीची अनेक ठिकाणी दुुरवस्था झाली आहे.

Palli-Sava school's dormancy, administration has asked for amendment | भेळीव-सावे शाळेची दुरवस्था, प्रशासनाकडे केली दुरुस्तीची मागणी

भेळीव-सावे शाळेची दुरवस्था, प्रशासनाकडे केली दुरुस्तीची मागणी

Next

विनोद भोईर 
पाली : रायगड जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीची अनेक ठिकाणी दुुरवस्था झाली आहे. सुधागड तालुक्यातील माणगाव बु. ग्रामपंचायत हद्दीतील भेळीव सावे येथील जिल्हा परिषदेची शाळा मोडकळीस व धोकादायक झाली आहे. याबाबत अनेक वेळा तक्र ार व प्रस्ताव पाठवून जिल्हा परिषदेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने दुर्घटना घडल्यास त्याला जिल्हा परिषद प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा पालकवर्गाने दिला आहे.
भेळीव सावेतील शाळेची इमारत जीर्ण होऊन धोकादायक बदली आहे. मात्र रायगड जिल्हा परिषदेकडून या इमारतीची साधी दखलही घेण्यात आलेली नाही. शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने १२ जानेवारी २०१६ रोजी दिलेल्या अर्जात शाळा इमारतीच्या छताच्या दुरु स्तीबाबत मुख्याध्यापकांनी अर्ज पाठवला आहे. याशिवाय पावसाळ्यातील इमारतीची गळती थांबवण्यासाठी ही दुरुस्ती त्वरित होणे आवश्यक असून सिलिंग कधीही कोसळेल अशा स्थितीत असल्याचे अर्जात नमूद केले आहे. शाळेच्या वतीने अनेकदा प्रस्ताव पाठवूनही रायगड जिल्हा परिषदेने इमारतीच्या दुरुस्तीबाबत गांभीर्य दाखवलेले नाही.
शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग भरविले जात असून विद्यार्थी पटसंख्या ३५ ते ४० इतकी आहे. जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.
पावसाळ्यात संपूर्ण शाळा गळत होती. शाळेचे काँक्र ीट छत दबले आहे. एखादा दुर्घटना घडू नये म्हणून मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना भेळीव सावेच्या जुन्या शाळेत हलवण्यात आले होते. लाखो रु पये खर्च करून २००६ - ०७ मध्ये बांधण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीची अवस्था बिकट धोकादायक झाली आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेने वेळीच लक्ष देऊन भेळीव सावे शाळेच्या इमारतीची दुरु स्ती करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
>विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ
पहिली ते चौथीपर्यंत वर्ग भरविले जात असून विद्यार्थी पटसंख्या ३५ ते ४० इतकी आहे. जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळत असून दुर्घटना घडल्यास त्याला सर्वस्वी जिल्हा प्रशासनच जबाबदार असेल, असे पालकांचे म्हणणे आहे.

Web Title: Palli-Sava school's dormancy, administration has asked for amendment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड