७५ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेले पळचिल आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 02:47 AM2017-10-27T02:47:44+5:302017-10-27T02:47:46+5:30

पोलादपूर : तालुक्यातील मौजे पळचिल येथे २००८-०९ साली ७५ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेले पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत गेले अनेक वर्षे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

Palliative Health Center constructed with cost of Rs 75 lakh waiting for inauguration | ७५ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेले पळचिल आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

७५ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेले पळचिल आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

Next

प्रकाश कदम 
पोलादपूर : तालुक्यातील मौजे पळचिल येथे २००८-०९ साली ७५ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेले पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत गेले अनेक वर्षे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. लाखो रुपये खर्चूनही इमारतीच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याने पावसाळ्यात संपूर्ण इमारत गळत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय इमारतीमध्ये साप, विंचवांचा वावर वाढल्याचे नागरिक
सांगतात.
पळचिल येथे प्राथमिक आरोग्य केंद्र २००४मध्ये मंजूर झाल्यापासून इमारतीचे काम सुरू झाले. मात्र, शासनाने लाखो रुपये खर्चातून बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन कधी आणि केव्हा होणार, अशी प्रतीक्षा पंचक्र ोशीतील जनतेला लागून राहिली आहे. या ठिकाणी असलेल्या आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी भेट देऊन आरोग्य व सेवेची माहिती देत असतात.
राजिपचे माजी उपाध्यक्ष तथा जि.प. सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, ते म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने संपूर्ण इमारत पावसाळ्यात गळत होती. यासाठी आपण जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमार्फत इमारतीच्या निकृष्ट कामाची चौकशी लावली असून, जिल्हा प्रशासनाकडून काम पूर्ण करून इमारत सुसज्ज करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
इमारतीच्या संरक्षण भिंतीसाठी २० लाखांचा निधी तसेच इमारतीला पत्राशेडसाठी २८ लाख ५६ हजारांचा निधी मंजूर करून काम सुरू केले असून येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेतून २५ लाख रुपये खर्चातून बंधाºयाचे बांधकाम करण्यात आले आहे.
इमारतीला प्लास्टर, रंगरंगोटी, तुटलेले दरवाजे, खिडक्या, लादी यासाठी ही निधी उपलब्ध करून देणार आहे. विद्युतपुरवठा तसेच सौरऊर्जेचा वापर करून इमारतीची दिवाबत्तीची सोय करण्यात येणार आहे. येथील अपूर्ण असणाºया सर्व सोयी-सुविधा लवकरच पूर्ण करून या प्रा. आ. केंद्राच्या नवीन इमारतीचे लवकरच उद्घाटन करणार असल्याचा आत्मविश्वास माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी व्यक्त केला आहे.
पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४४ गावांचा समावेश असून या अंतर्गत ५ उपकेंद्रे आहेत. या आरोग्य केंद्रात ११ पदे मंजूर असून ३ पदे रिक्त आहेत. यामध्ये १ वैद्यकीय अधिकारी रिक्त, १ मलेरिया सहायक, १ शिपाई ही पदे रिक्त तर कुष्ठरोग तज्ज्ञ डेपोरेसनसाठी पोलादपूर ता. आ. अधिकारी कार्यालय येथे कार्यरत आहे.
>आरोग्य केंद्रात दररोज बाह्यरु ग्ण विभागामध्ये १५ ते २0 रु ग्ण उपचार घेत आहेत. केंद्रात विंचूदंश, सर्पदंश, श्वानदंशसाठी लागणारी औषधे आणि मागणीप्रमाणे औषधसाठा परिपूर्ण असल्याचे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मराठे यांनी सांगितले.

Web Title: Palliative Health Center constructed with cost of Rs 75 lakh waiting for inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.