शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पंचनामे २२ कोटींचे, वाटप मात्र १२ कोटींचेच; निसर्ग चक्रीवादळ अपादग्रस्तांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 4:15 AM

नुकसानभरपाईस विलंब, वादळामुळे १५ हजार ५७९ दुर्घटना

उदय कळसम्हसळा : निसर्ग चक्रीवादळामुळे म्हसळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. प्रशासनाने २२ कोटी रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत, पैकी आतापर्यंत ११ कोटी ८७ लाख २० हजार २६१ रुपयांचे अनुदान प्रशासनामार्फत वितरीत करण्यात आले आहे. अद्यापही नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात विलंब होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी १०० कोटींची तातडीची मदत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केली. चक्रीवादळाच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालेल्या रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने आणखी ३०१ कोटींची मदत जाहीर केली आहे.एकत्रीत ३७३ कोटी रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे जमा झाली आहे.

म्हसळा तालुक्यातील म्हसळा नगरपंचायत व ३९ ग्रामपंचायतीतील प्रत्येक गाववाडींत एकूण १५ हजार ५७९ दुर्घटना घडल्या.त्यामध्ये प्रामुख्याने एक जीवित हानी, ३१ मृत जनावरे, ३ पोल्ट्री फॉर्म, १८३ पूर्णत: पडलेली घरे, १४ हजार ४९४ अशंत: पडलेली घरे, २३ झोपड्या, ७८१ गुरांचे गोठे, ६३ दुकान टपऱ्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे ७ हजार ८३ लाभार्थ्यांचे अपरिमीत नुकसान झाले. सुमारे २१ कोटी ९८ लाख २८ हजार ३३९ नुकसानीचे पंचनामे करण्यात प्रशासनाला यश आले. प्रशासनाने आता मदत वाटपाला सुरुवात केली आहे. तालुक्यातील काही अपादग्रस्ताना ११ कोटी ८७ लाख २० हजार २६१ रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. मात्र मदत वाटपामध्ये विलंब होत असल्याने आपादग्रस्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.१८६३.६१ हेक्टर क्षेत्रांतील फळबागायतीचे नुकसानम्हसळा तालुक्यांतील ४४२५ बाधित शेतकऱ्यांचे १८६३.६१ हेक्टर क्षेत्रांतील फळबागायतीचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा क्षेत्र १३४८.०९ हेक्टर, काजू ३८९.५ १ हेक्टर, नारळ ५ ०.२० हेक्टर, सुपारी २९.३१ हेक्टर इतर फळपिके ४६.५० या बागायती क्षेत्रात नुकसान झाले आहे. फळपिकांसाठी पूर्वी १८ हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसान देण्यात येत होते. सरकार बागायतदारांना ५० हजार प्रति हेक्टरी नुकसान देणार आहे.वाढीव नुकसान भरपाईचे काय झाले?पहिल्या जीआरनुसार नुकसानग्रस्तांना प्रत्येकी १५ हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्राप्त झाले होते; परंतु त्यानंतर सरकारच्या नवीन आदेशानुसार नुकसानग्रस्तांना १५ हजार रुपये अधिक १० हजार वाढीव असे एकूण प्रत्येकी २५ हजार रुपये देण्याचे आदेश असतानाही वाटप का करण्यात आले नाही?असा प्रश्न उपस्थित केला आहे. म्हसळा तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचाºयाजवळ विचारणा केली असता काहीही सांगण्यास नकार देण्यात आला. याबाबत पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी पाठपुरावा करून नुकसानग्रस्तांना न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे.तालुक्यातील अपादग्रस्ताना ११ कोटी ८७ लक्ष २० हजार २६१ रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित अनुदानही उपलब्ध आहे. लाभार्थींच्या खात्यावर अनुदान जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणीही पात्र लाभार्थी अनुदानापासून वंचित राहणार नाही.-शरद गोसावी, तहसीलदार, म्हसळा

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळRaigadरायगड