पनवेल - अलिबाग विना वाहक बससेवेचा शुभारंभ
By admin | Published: July 28, 2016 03:43 AM2016-07-28T03:43:44+5:302016-07-28T03:43:44+5:30
पनवेल -अलिबाग- पनवेल अशा थेट एसटी बससेवेचा शुभारंभ बुधवारी झाला. पनवेल व अलिबाग आगारामधून दर अर्धा तासाने नेहमीच्या सेवांव्यतिरिक्त या गाड्या सोडण्यात येणार
पनवेल : पनवेल -अलिबाग- पनवेल अशा थेट एसटी बससेवेचा शुभारंभ बुधवारी झाला. पनवेल व अलिबाग आगारामधून दर अर्धा तासाने नेहमीच्या सेवांव्यतिरिक्त या गाड्या सोडण्यात येणार आहेत. सकाळी ६ वाजता पहिली गाडी पनवेलवरुन सुटणार आहे.
या सेवेचा शुभारंभ प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ. भक्तिकुमार दवे, कार्यवाह श्रीकांत बापट यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. शुभारंभावेळी बसमधून एकूण ४४ प्रवाशांनी प्रवास के ला. पनवेल- अलिबाग या गाडीचे भाडे ६४ रुपये आहे. ही बससेवा सकाळी ६ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत चालेल. एकूण ३२ फेऱ्या होणार असल्याची माहिती पनवेलचे आगार प्रमुख राजेंद्र परदेशी यांनी दिली. या गाडीत वाहक नसल्याने तिकिटाचे बुकिंग पनवेल, अलिबाग आगाराद्वारे नेमलेल्या वाहकामाफत होणार आहे. बस कोणत्याही थांब्यावर थांबणार नसल्याने प्रवाशांना लवकर मार्गक्रमण करता येणार आहे. यावेळी अलिबागच्या प्रवाशांना पनवेलहून रेल्वेने मुंबई व उपनगरात जाणे सोईचे व्हावे म्हणून अलिबागहून पनवेलकडे येणाऱ्या त्या थेट गाड्या व्हाया पनवेल रेल्वे स्टेशन मार्गे आगारात आणाव्यात असा प्रस्ताव मान्य करण्याची विनंती प्रवासी संघाने एस.टी. महामंडळाकडे
के ली.(प्रतिनिधी)
३२ फेऱ्या होणार : या गाडीत वाहक नसल्याने तिकिटाचे बुकिंग पनवेल,अलिबाग आगाराद्वारे नेमलेल्या वाहकामार्फत होणार आहे. बस कोणत्याही थांब्यावर थांबणार नसल्याने प्रवाशांना लवकर मार्गक्रमण करता येणार आहे. एकूण ३२ फेऱ्या होणार असल्याची महिती पनवेलचे आगार प्रमुख राजेंद्र परदेशी यांनी दिली.