कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांविरोधात पनवेल महापालिका एक्शन मोडवर
By वैभव गायकर | Published: February 6, 2024 06:31 PM2024-02-06T18:31:47+5:302024-02-06T18:32:05+5:30
थकबाकीदारांच्या विरोधात महापालिका कारवाईचे पाऊल उचलणार
पनवेल: महानगरपालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांच्या विरोधात महापालिका कारवाईचे मोठे पाऊल उचलणार आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार महापालिका थकबाकीदारांच्या स्थावर अथवा जंगम मालमत्ता अटकावणी करुन त्याची जाहिर लिलावाने विक्री करुन थकबाकी वसूल करणार आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे 3 लाख 50 हजार मालमत्तांना कराची आकारणी करण्यात आली आहे.दि.6 रोजी पर्यंत 248 कोटीची वसुली पालिकेने केली आहे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १२८ व अनुसूची ड प्रकरण ८ कराधान नियम ४७ अन्वये महानगरपालिकेस देय असलेल्या कराच्या थकबाकी पोटी जंगम स्थावर मालमत्ता जप्त अथवा अटकावणी करुन जाहिर लिलावाने विक्री करून थकबाकी वसूल करणेची तरतूद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १२८ व अनुसूची ड प्रकरण ८ कराधान नियम ४७ अन्वये महानगरपालिकेस आहे.
मालमत्ता धारकांनी महापालिकेचा मालमत्ता कर भरावा यासाठी महापालिकेने सातत्याने विविध उपाय योजना आमलात आणल्या आहेत. सुरूवातीस एकरकमी मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी शास्तीमध्ये १०० टक्क्यांपासून ते २५ टक्क्यांपर्यंतची टप्या्तटप्याू ने शास्तीमध्ये सवलत देऊ केली होती. मुदतीत हरकत न घेतलेल्या मालमत्ता धारकांना नैसर्गिक न्याय मिळावा या तत्वाने व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अंतर्गत कराधान नियमानुसार कर आकारणीत दुरुस्ती ,फेरफार करणेची तरतुद असल्याने मालमत्ता धारकांना हरकत अर्ज करण्यासाठीची एक संधी महापालिकेच्यावतीने देण्यात आली होती.
मालमत्ता कर हा पालिकेचा उत्पन्नाचा स्त्रोत आहे. शेवटी महापालिकेने मालमत्ताधारकांना वसुलीच्या नोटीस देण्यास पालिकेने सुरूवात केली व महापालिकेच्या चारही प्रभागामधील ,सिडको नोडमध्ये विविध टिमच्या माध्यमातून वसुली करण्यात येत आहे. आता महापालिका थकबाकीदारांच्या स्थावर अथवा जंगम मालमत्ता अटकावणी करुन त्याची जाहिर लिलावाने विक्री करुन थकबाकी वसूल करणार आहे. यामध्ये औद्योगिक, निवासी, अनिवासी यांचा समावेश असणार आहे.