शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांविरोधात पनवेल महापालिका एक्शन मोडवर

By वैभव गायकर | Published: February 06, 2024 6:31 PM

थकबाकीदारांच्या विरोधात महापालिका कारवाईचे पाऊल उचलणार

पनवेल: महानगरपालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांच्या विरोधात महापालिका कारवाईचे मोठे पाऊल उचलणार आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार महापालिका थकबाकीदारांच्या स्थावर अथवा जंगम मालमत्ता अटकावणी करुन त्याची जाहिर लिलावाने विक्री करुन थकबाकी वसूल करणार आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे 3 लाख 50 हजार मालमत्तांना कराची आकारणी करण्यात आली आहे.दि.6 रोजी  पर्यंत  248 कोटीची वसुली पालिकेने केली आहे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १२८ व अनुसूची ड प्रकरण ८ कराधान नियम ४७ अन्वये महानगरपालिकेस देय असलेल्या कराच्या थकबाकी पोटी जंगम स्थावर मालमत्ता जप्त अथवा अटकावणी करुन जाहिर लिलावाने विक्री करून थकबाकी वसूल करणेची तरतूद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १२८ व अनुसूची ड प्रकरण ८ कराधान नियम ४७ अन्वये महानगरपालिकेस आहे.

मालमत्ता धारकांनी महापालिकेचा मालमत्ता कर भरावा यासाठी महापालिकेने सातत्याने विविध उपाय योजना आमलात आणल्या आहेत. सुरूवातीस एकरकमी मालमत्ता कर  भरणाऱ्यांसाठी  शास्तीमध्ये १०० टक्क्यांपासून ते २५ टक्क्यांपर्यंतची टप्या्तटप्याू ने शास्तीमध्ये सवलत देऊ केली होती.  मुदतीत हरकत न घेतलेल्या मालमत्ता धारकांना नैसर्गिक न्याय मिळावा या तत्वाने व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९  अंतर्गत कराधान नियमानुसार कर आकारणीत दुरुस्ती ,फेरफार करणेची तरतुद असल्याने मालमत्ता धारकांना हरकत अर्ज करण्यासाठीची एक संधी महापालिकेच्यावतीने देण्यात आली होती. 

मालमत्ता कर हा पालिकेचा उत्पन्नाचा स्त्रोत आहे. शेवटी महापालिकेने  मालमत्ताधारकांना वसुलीच्या नोटीस देण्यास पालिकेने सुरूवात केली व महापालिकेच्या चारही प्रभागामधील ,सिडको नोडमध्ये विविध टिमच्या माध्यमातून वसुली करण्यात येत आहे. आता महापालिका थकबाकीदारांच्या स्थावर अथवा जंगम मालमत्ता अटकावणी करुन त्याची जाहिर लिलावाने विक्री करुन थकबाकी वसूल करणार आहे. यामध्ये औद्योगिक, निवासी, अनिवासी यांचा समावेश असणार आहे.