शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
2
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
3
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
4
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
5
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
6
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
7
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
8
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
9
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
10
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
11
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
12
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
13
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
14
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
15
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
16
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
17
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
18
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
19
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
20
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?

Panvel: पनवेल पालिकेच्या 750 थकबाकीदारांना नोटिसा ;लवकरच जप्तीची कारवाई 

By वैभव गायकर | Published: October 19, 2023 5:49 PM

Panvel News: महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना  महापालिकेच्यावतीने जप्तीपूर्व नोटीसा देण्यास सुरूवात करण्यात आली असून आत्तापर्यंत 750 थकबाकीदारांना पालिकेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे.

- वैभव गायकरपनवेल - महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना  महापालिकेच्यावतीने जप्तीपूर्व नोटीसा देण्यास सुरूवात करण्यात आली असून आत्तापर्यंत 750 थकबाकीदारांना पालिकेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये औद्योगिक 100 मालमत्तांना, निवासी 301 मालमत्तांना , वाणिज्य ( कमर्शिअल) क्षेत्रातील 349 मालमत्ता अशा एकुण 750 थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

याकरिता खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल अशा चारही नोडमध्ये आठ पथक तयार  करण्यात आल्या आहेत.महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख स्त्रोत आहे.न्यायालयानेही मालमत्ता कर,वसुलीला स्थगिती दिली नाही. त्यामुळे महापालिका मालमत्ता कराच्या वसुलीवरती भर देत आहे.महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या  औद्योगिक , निवासी , वाणिज्य ( कमर्शिअल)  क्षेत्रातील उच्चतम थकबाकीदारांना त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता अटकावणी संबधीच्या तसेच जप्तीपूर्व नोटीसा देण्यास सुरूवात केली आहे. येत्या काळात जप्ती पूर्व नोटीसा दिलेल्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर न भरल्यास त्यांच्या स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे.

जप्तीपूर्व नोटीसा देण्यासाठी  महापालिकेच्यावतीने प्रत्येक प्रभागासाठी दोन अशी आठ पथके तयार केली आहेत. तसेच मालमत्तांधारकांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत.या आर्थिक वर्षामध्ये महापालिकेचा मालमत्ता कर भरणाऱ्यामालमत्ताधारकांकडून चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. एप्रिल महिन्यापासून ऑक्टोबरपर्यंत 200 कोटी रूपयांची भर महापालिकेच्या तिजोरीमध्ये झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून ते आजपर्यंत 475 कोटींची वसुली करण्यात आली.मालमत्ता खरेदी विक्री करताना खबरदारी घ्या नागरिकांनी मालमत्ता खरेदी विक्री करताना मालमत्ता आयडी (यूपीआयसी आयडी) नमुद करावा असे आवाहन मालमत्ता कर विभागाच्यावतीने केले आहे.जेणे करून सदर मालमत्तेचा मालमत्ता कर भरला आहे की नाही याची माहिती नागरिकांना त्वरीत  कळणार आहे.नागरिकांनी मालमत्ता खरेदी अथवा विक्री करताना महापालिकेचा मालमत्ता कर भरला आहे की नाही याची शहानिशा करूनच मालमत्ता खरेदी अथवा विक्री करावी असे अवाहन मालमत्ता विभागाचे प्रमुख उपायुक्त गणेश शेटे यांनी केले आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. येत्या काळात पनवेल शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. सध्या महानगरपालिकाही विकासाच्या महत्वाच्या टप्प्यावरती आहे. महापालिकेचा  विकास आराखडा राबविताना प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख स्त्रोत आहे. नागरिकांनी मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावे.- गणेश देशमुख (आयुक्त ,पनवेल महानगरपालिका)

टॅग्स :panvelपनवेल