पनवेल:पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या 30 एप्रिल रोजी मतदान होणार असून त्या दिवशी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे. एकूण १८ जागांसाठी बाजार समितीची निवडणूक होणार आहे.बाजार समिती मधील भ्रष्टचारावरून येथील समिती बरखास्त करण्यात आली असुन सध्याच्या घडीला प्रशासकांच्या हाती समितीचा कारभार आहे.
पनवेल उरण तालुक्याबरोबरच घाटमाथ्यावरील शेतकरी आपले शेती उत्पादन घेऊन पनवेलच्या बाजारात येतात. कांद्याबरोबरच भाजीपाला विक्रीसाठी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती ओळखली जाते. शहराच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या या बाजार समितीवर सातत्याने शेतकरी कामगार पक्षाची सत्ता राहिलेली आहे. लालबावट्याने कायम या ठिकाणी प्राबल्य निर्माण केले आहे.पनवेल ग्रामीण भागातील शेतकरी विशेषतः याठिकाणी आपले भाजीपाला याठिकाणी विकत असतात.आजवर शेकापची एकहाती सत्ता याठिकाणी राहिली आहे.बाजार समितीच्या सार्वजनिक निवडणुकीची बिगुल वाजले आहे. २७ मार्च ते ३ एप्रिल पर्यंत नामनिर्देशक पत्र भरता येणार आहेत. ५ एप्रिल रोजी आलेल्या अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही 20 एप्रिल पर्यंत असणार आहे. ३० एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या दरम्यान मतदान घेतले जाणार आहे.