पनवेलची आरोग्य सुविधा सलाइनवर, रुग्णांची होतेय परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 11:51 PM2019-02-09T23:51:11+5:302019-02-09T23:51:24+5:30

तालुक्यातील आरोग्य विभागाच्या केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे समोर आले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या या आरोग्य केंद्रात १२ कर्मचा-यांची कमतरता आहे, त्यामुळे आरोग्य केंद्राच्या कामकाजावर ताण पडत असून याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.

 Panvel's healthcare facility, patients' condition is affordable | पनवेलची आरोग्य सुविधा सलाइनवर, रुग्णांची होतेय परवड

पनवेलची आरोग्य सुविधा सलाइनवर, रुग्णांची होतेय परवड

Next

- मयूर तांबडे

पनवेल : तालुक्यातील आरोग्य विभागाच्या केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे समोर आले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या या आरोग्य केंद्रात १२ कर्मचा-यांची कमतरता आहे, त्यामुळे आरोग्य केंद्राच्या कामकाजावर ताण पडत असून याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील मोरबे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची नवीन इमारत मागील तीन-चार वर्षांपासून तयार असून वापर होत नाही. कर्मचाºयांअभावी हे उपकेंद्र बंद ठेवल्याचे समजते. लाखो रु पये खर्च करून उभारण्यात आलेली ही इमारत वापराविना पडून असल्याने तिची दुरवस्था झाली आहे. खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. मोरबेची लोकसंख्या हजारोच्या घरात आहे. या विभागात आदिवासी लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. आरोग्य उपकेंद्रच बंद असल्याने परिसरातील रुग्णांना सुकापूर, नवीन पनवेल, पनवेलमधील खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी धाव घ्यावी लागते. यात वेळे व पैशांचा अपव्यय होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील प्राथमिक ग्रामीण आरोग्य केंद्राचीही दुरवस्था झाली आहे. कर्मचाºयांची रिक्त पदे न भरली गेल्याने त्याचा कामकाजावर परिणाम झाला आहे. तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आठ उपकेंद्रे आहेत. ग्रामपातळीवर आरोग्यसेवा पुरवता याव्यात, यासाठी ३२ उपकेंद्रे सुरू करण्यात आली आहेत; परंतु केंद्राची इमारत बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने यातील अनेक उपकेंद्रांचे प्रस्ताव कागदावरच सीमित राहिले आहेत.
३५ हजार लोकसंख्येला एक प्राथमिक केंद्र तर पाच हजार लोकसंख्या असणाºया ठिकाणी एक उपकेंद्रे असायला हवे. मात्र, पनवेलमध्ये प्रत्यक्षात एका प्राथमिक केंद्राला लाखोची लोकसंख्या आहे. तालुक्यातील वाजे, वावंजे, तळोजा, कळंबोली, पालेखुर्द, आजिवली, कोन, कोळखे, गव्हाण, न्हावा, वहाळ, वडघर, केळवणे, नेरे, शिरढोण येथील उपकेंद्रांना स्वत:ची इमारत नाही. जागा नसल्यामुळे उपकेंद्रांना इमारत बांधताना अडचण निर्माण होत आहे. रिटघर आणि खारघर येथील इमारत नादुरु स्त आहे. धामणी, मोरबे, काळुंद्रे, पोयंजे, आपटा, गुळसुंदे, कल्हे, साई, वावेघर, ओवळे, रोहिंजण, नावडे, आसूडगाव, येथील उपकेंद्रांना स्वत:ची इमारत आहे. तर रिटघर आणि खारघर येथील उपकेंद्रे भाड्याच्या इमारतीत चालविले जात आहेत. दापोली येथील उपकेंद्रासाठी सिडकोकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये एकूण ३९ महिला आरोग्यसेविकांपैकी प्रत्यक्षात ३५ आरोग्यसेविका कार्यरत आहेत. तर तळोजा, काळुंद्रे, नेरे, वाजे येथील उपकेंद्रातील आरोग्यसेविकांची चार पदे रिक्त आहेत. पुरु ष आरोग्यसेवक ३५ पदे मंजूर असून मोरबे, वडघर, पोयंजे, आसूडगाव येथे चार जागा रिक्त आहेत. सफाई कामगारांची तीन पदे रिक्त आहेत. तर वावंजे येथे लॅबटेक्निशियन नाही. नेरे, आजिवली, वावंजे, आपटा येथील केंद्रांमध्ये चार शिपाई जागा रिक्त आहेत.

मोरबे येथे बांधण्यात आलेले उपकेंद्र गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे, त्यामुळे नागरिकांना उपचारासाठी अन्यत्र जावे लागत आहे. आरोग्य विभागाने हे उपकेंद्र चालू करावे.
- रवींद्र पाटील- कोंडले, समाजसेवक, मोरबे,

आरोग्यकेंद्रातील रिक्त जागांसाठी जिल्हास्तरावर पाठपुरावा सुरू आहे. त्यानुसार लवकरच कार्यवाही करता येईल.
- राजेंद्र इटकरे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, पनवेल

 

Web Title:  Panvel's healthcare facility, patients' condition is affordable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य