पोलादपुरात महामार्ग भूसंपादनात अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:59 AM2017-07-28T00:59:49+5:302017-07-28T00:59:49+5:30
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात सातत्याने सहकार्याची भूमिका घेणाºया पोलादपूर शहरातील महामार्ग बाधित ७५हून अधिक ग्रामस्थांना भूसंपादित केलेल्या जमिनीचे अत्यल्प दर देऊन शासन पोलादपूरकरांवर अन्याय करत आहे.
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात सातत्याने सहकार्याची भूमिका घेणाºया पोलादपूर शहरातील महामार्ग बाधित ७५हून अधिक ग्रामस्थांना भूसंपादित केलेल्या जमिनीचे अत्यल्प दर देऊन शासन पोलादपूरकरांवर अन्याय करत आहे.
शेजारील महाड नगरपरिषदेच्या हद्दीत जमिनीला रेडिरेकनरचा दर सात लाख असून, तेथील ग्रामस्थांना प्रतिगुंठा १४ लाख रु पये, हा दर दिला गेला. त्या तुलनेत पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील जमिनीला दर मिळावा, ही रास्त मागणी ग्रामस्थांची आहे. वास्तविक पाहता, पोलादपूर एस.टी.बसस्थानकाला लागून एक किलोमीटरचा परिसर हा वाणिज्य वापराचा आहे.
तसेच पोलादपूर हे ऐतिहासिक व पर्यटनस्थळ असून, पोलादपूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या परिसरात व्यापाराची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. याच भागातून सातारा-बंगळुरू मार्ग, पणजी, तळकोकणात जाणारा मार्ग, महाड, विन्हेरे,दापोली, मंडनगड मार्ग जातो, त्यामुळे ही तालुक्याची प्रमुख बाजारपेठ आहे. आजच्या बाजारभावाने या जमिनीचा भाव प्रतिगुंठा २० लाख रु पयेप्रमाणे आहे. त्यामुळे शासनाने किमान बाजारभावाप्रमाणे या जमिनीला दर द्यावा, ही मागणी ग्रामस्थांची आहे. तसे निवेदन ग्रामस्थांनी मुख्यमंत्री महोदयांना दिले आहे. या मागणीचा शासनाने विचार करून पोलादपूरकरांवरील अन्याय दूर करावा. आयुष्यभरचे उदरनिर्वाहाचे साधन असणारी व्यापारी जमीन शासनाच्या योजनेसाठी दिल्यानंतर किमान उर्वरित आयुष्यात जगण्याइतपत जमिनीचा दर शासनाने द्यावा, या मागणीचा शासन दरबारी सकारात्मक विचार व्हायलाच हवा, अशा सर्व मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी इनामदार यांना देण्यात आले.
पोलादपूर येथील महामार्गाचे रु ंदीकरण करून केला जाणारा रस्ता हा सध्याच्या महामार्गापेक्षा सुमारे चार-पाच मीटर जमीन खोदून, दोन्ही बाजूने भिंत उभारून जमिनीअंतर्गत बोगद्यासारखा बनविला जाणार असल्याची माहिती मिळते. तसे झाल्यास पोलादपूरचा व्यवसाय हा महामार्गावर प्रवास करणाºया प्रवाशांच्या जीवावर चालतो. पोलादपूरकरांचे उत्पन्नाचे हे एकमेव साधन आहे. त्यामुळे अशा प्रकारचा रस्ता बनविण्यास ग्रामस्थांचा सक्त विरोध आहे. तसा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महामार्ग बाधित समितीने दिला आहे. त्यामुळे पोलादपूर येथील नवीन बनविला जाणारा महामार्ग हा आताच्या महामार्गाचे रु ंदीकरण हे सद्यपरिस्थितीत असणाºया महामार्गास लागून समांतररेषेत दोन्ही बाजूने करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.हा महामार्ग लवकरात लवकर व्हावा, यासाठी ग्रामस्थांची सहकार्याची भूमिका असून, आपले जमिनीचे हक्क अबाधित ठेवून शासनाला सहकार्य करण्याची भूमिका ग्रामस्थांकडून घेतली गेली आहे. मात्र, जमिनीला योग्य दर मिळावा, यासाठीची मागणी शासन दरबारी लावून धरत आलेल्या दराने रक्कम स्वीकारण्याची तयारी दाखवून वाढीव मोबदला रक्कम व नुकसानभरपाई मागणीची कारवाई करण्याचे हक्क राखून ठेवून (अंडर प्रोटेस्ट) स्वीकारण्याची तयारी ग्रामस्थांनी दाखवली आहे.