शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

परळ-अलिबाग एसटी बस चालकाला आंदाेलकांनी दिला बांगड्यांचा आहेर, तर कार्लेखिंड येथे मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2021 4:48 PM

राज्य सरकारमध्ये विलीन करण्याच्या प्रमुख मागणीसह एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी अन्य मागण्यांसाठी राज्यभर संप पुकारला आहे.

राज्य सरकारमध्ये विलीन करण्याच्या प्रमुख मागणीसह एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी अन्य मागण्यांसाठी राज्यभर संप पुकारला आहे. रायगड जिल्ह्यातही संप सुरु आहे. अलिबाग आगारातही याबाबत आंदाेलन सुरु आहे. असे असताना आज सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास परळ-अलिबाग एसटी प्रवाशांना घेऊन आल्याने  आंदाेलक चांगलेच संतापले. त्यांनी संबंधित चालकाला बांगड्यांचा आहेर दिला, तर वाहकाच्या गळ्यात पुष्पमाला घालून निषेध व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अलिबाग आगारामध्ये सकाळी परळ-अलिबाग एसटी आली. परळहून एसटी आल्याचे पाहील्यावर अलिबाग आगारातील आंदाेलकांचा पार चांगलाच चढला. आंदाेलन सुरु असताना तुम्ही एसटी आणलीच कशी, याचा जाब त्यांनी संबंधित चालकाला आणि वाहकाला विचारला. त्यानंतर महिला आंदाेलकाने चालकाला बांगड्यांचा आहेर दिला तर महिला वाहकाच्या गळ्यात पुष्पमाळा घालत निषेध व्यक्त केला.

दरम्यान, सदरची एसटी कार्लेखिंड येथे सकाळी दहा-सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास आली तेव्हा दाेन अज्ञातांनी बसमध्ये प्रवेश करत संबंधीत चालकाला मारहाण केली. या घटनेची नाेंद अलिबाग पाेलीस ठाण्यात करण्यात आली आहे.बस चालकाचे नाव काशिनाथ गायकवाड असे आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रStrikeसंप