शाळेची इमारत पालक करणार दुरुस्त
By admin | Published: December 16, 2015 12:52 AM2015-12-16T00:52:42+5:302015-12-16T00:52:42+5:30
तालुक्यातील नेरळ येथील कन्या शाळेची इमारत १०० वर्षे जुनी आहे. अनेक वर्षे दुरु स्ती न केल्यामुळे ही इमारत धोकादायक झाली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी वर्ग भरविले जात नाहीत.
कर्जत : तालुक्यातील नेरळ येथील कन्या शाळेची इमारत १०० वर्षे जुनी आहे. अनेक वर्षे दुरु स्ती न केल्यामुळे ही इमारत धोकादायक झाली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी वर्ग भरविले जात नाहीत. इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सातत्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र कोणीही लक्ष देत नसल्याने अखेर पालकांनी वर्गणी काढून इमारतीची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला असून, तो कर्जत पंचायत समितीला कळविला आहे.
नेरळ येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. यावर्षी शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यापासून या इमारतीच्या वर्गात कोणताही विद्यार्थी बसविला जात नाही, तसा निर्णय कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने घेतला असून नेरळ कन्या शाळेमधील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग दोन शिफ्टमध्ये भरविले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्र म पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. पालकांनी याबाबत कर्जत पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. अनेक ठराव आणि निवेदने येथील शालेय व्यवस्थापन समितीने कर्जत पंचायत समितीकडे गेल्या दोन वर्षात सादर केली आहेत. तरी देखील १०० वर्षे जुन्या शाळेची दुरु स्ती करण्याचे किंवा नवीन वास्तू मंजूर करण्याचे काम प्रशासनाकडून होत नाही. गेली चार महिने सातत्याने कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. यामुळे शालेय व्यवस्थापन समिती आक्र मक झाली आहे.
दोन शिफ्टमध्ये शाळा भरविली जात असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान भरून निघणे कठीण असल्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासन करणार नसेल तर पालक वर्गणी गोळा करून जुन्या इमारतीच्या वर्गखोल्यांची दुरु स्ती करण्याचा निर्णय पालक सभेत घेतला आहे. सभेसाठी कविता शिंदे, सुभाष नाईक, सविता भाटकर, आरती राणे आदी पालक उपस्थित होते.