वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार्किंगची समस्या

By admin | Published: February 23, 2017 06:09 AM2017-02-23T06:09:52+5:302017-02-23T06:27:03+5:30

पनवेल शहरातील वाहतूक समस्या नवीन नाही. तालुक्याचे ठिकाण असलेल्या पनवेलमधून दररोज

Parking problem in Vasudev Balwant Phadke Natyagrhat | वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार्किंगची समस्या

वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार्किंगची समस्या

Next

पनवेल : पनवेल शहरातील वाहतूक समस्या नवीन नाही. तालुक्याचे ठिकाण असलेल्या पनवेलमधून दररोज हजारो गाड्या ये-जा करतात. अरुं द रस्त्यामुळे याचा परिणाम वाहतुकीवर होतो. अनेक जण आपली वाहने रस्त्यावर लावून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन क रतात. शहरात नगरपरिषदेने बांधलेल्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात देखील पार्किंगच्या समस्या भेडसावत आहेत. विशेष म्हणजे, या नाट्यगृहात प्रेक्षकांच्या क्षमतेपेक्षा वाहनतळाची जागा अपुरी आहे. त्यामुळे या नाट्यगृहात असलेली भूमिगत पार्किंग सुरू करण्याची मागणी होत आहे.
पनवेल शहरात केवळ एकच अधिकृत असे वाहन पार्किंगचे ठिकाण आहे, त्यामुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. नाट्यगृहात सध्याच्या घडीला ७५ ते ८० चारचाकी वाहन पार्किंगची क्षमता आहे. या नाट्यगृहात प्रेक्षक क्षमता ६५० एवढी आहे. मात्र, त्या दृष्टीने ही पार्किंग व्यवस्था अपुरी आहे. याचा परिणाम निश्चितच शहरातील वाहतूककोंडीवर होतो. एखाद्या कार्यक्र मा वेळी अथवा नाटकांच्या प्रयोगाच्या वेळी वाहन मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे नाइलाजास्तव या वाहनचालकांना या नाट्यगृहाच्या बाहेर वाहने पार्क करावी लागतात. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होेत आहे. नाट्यगृहात भूमिगत पार्किंग व्यवस्था आहे. सध्या याठिकाणी पथदिवे, बॅनर्स तसेच विविध पडिक वस्तू ठेवल्या आहेत. याठिकाणी जवळ जवळ १५० ते २०० दुचाकी, २५च्या आसपास चारचाकी वाहने उभी राहू शकतात. मात्र, नाट्यगृहातील पे अ‍ॅण्ड पार्क संदर्भात नव्याने निविदा काढण्यात येणार आहेत.त्यांनतर ही भूमिगत पार्किंग खुली करण्यात येणार आहे.
यासंदर्भात सिटिझन युनिट फोरमचे सदस्य मनोहर लिमये यांनी सांगितले की, नाट्यगृहात ही पार्किंग सध्याच्या घडीला सुरू करण्याची आवश्यकता आहे. पनवेलमधील वाहतुकीची समस्या बिकट आहे. याठिकाणी येणाऱ्या प्रेक्षकांना नाइलाजास्तव अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे रस्त्यावर वाहने पार्क करावी लागतात. जर याठिकाणचे भूमिगत पार्किंग सुरू केले, तर निश्चितच काही प्रमाणात याठिकाणचे रस्ते मोकळे श्वास घेऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही. (प्रतिनिधी)

नाट्यगृहात भूमिगत पार्किंगसह बाहेरील पार्किंगमध्ये पे अ‍ॅण्ड पार्क संदर्भात आम्ही नव्याने टेंडर काढणार आहोत. याकरिता आमची प्रक्रि यादेखील लवकरच पूर्णत्वाला येईल. कार्यक्र म असेल त्या दिवशी पे अ‍ॅण्ड पार्कबाबत सूट असणार आहे. त्यामुळे लवकरच ही प्रक्रि या पूर्ण झाल्यांनतर भूमिगत पार्किंग सुरू करण्यात येईल.
- अरु ण कोळी,
व्यवस्थापकीय अधिकारी,
वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह

Web Title: Parking problem in Vasudev Balwant Phadke Natyagrhat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.