जेएनपीटीच्या जासई उड्डाण पुलाचा एक भाग कोसळला; एक कामगार जागीच ठार तर सहा गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 06:23 PM2021-11-02T18:23:19+5:302021-11-02T18:23:51+5:30

काम सुरु असतानाच हा अपघात घडला. ढिगारा बाजूला सारून वाहनांसाठी मार्ग मोकळा करण्यात आला आहे.

part of JNPT Jasai flyover collapsed One worker was killed on the spot and six were seriously injured | जेएनपीटीच्या जासई उड्डाण पुलाचा एक भाग कोसळला; एक कामगार जागीच ठार तर सहा गंभीर

जेएनपीटीच्या जासई उड्डाण पुलाचा एक भाग कोसळला; एक कामगार जागीच ठार तर सहा गंभीर

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण : दास्तान ते शंकर मंदिर दरम्यान जासई नाका नजीक सुरू असलेल्या जेएनपीटीचा उड्डाण पूलावरील १४ मीटर उंचीवर  टाकण्यात आलेला वाय आकाराचा कॅप मंगळवारी दुपारी ४.१५ वाजताच्या सुमारास परातीसह अचानक कोसळला. या अपघातामध्ये एक कामगार जागीच मृत्यू झाला असून गंभीररित्या जखमी झालेल्या सहा कामगारांना जेएनपीटी आणि एमजीएम बेलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी दिली. काम सुरु असतानाच हा अपघात घडला. दरम्यान ढिगारा बाजूला सारून वाहनांसाठी मार्ग मोकळा करण्यात आला आहे.
 

Web Title: part of JNPT Jasai flyover collapsed One worker was killed on the spot and six were seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.