‘गंदगीमुक्त भारत’ मोहिमेत सहभागी व्हा; किरण पाटील यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 01:45 AM2020-08-11T01:45:30+5:302020-08-11T01:45:33+5:30

 ८ ते १५ ऑगस्टदरम्यान विविध उपक्रम

Participate in the 'Dirt Free India' campaign | ‘गंदगीमुक्त भारत’ मोहिमेत सहभागी व्हा; किरण पाटील यांचे आवाहन

‘गंदगीमुक्त भारत’ मोहिमेत सहभागी व्हा; किरण पाटील यांचे आवाहन

Next

अलिबाग : नागरिकांमध्ये स्वच्छता व आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टीने प्रभावी जनजागृती व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने ८ आॅगस्ट ते १५ आॅगस्ट या कालावधीत ‘गंदगीमुक्त भारत’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानामध्ये जास्तीतजास्त लोकांनी सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

याच विषयाच्या अनुषंगाने डॉ.किरण पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत, आरोग्य, शिक्षण, गट समन्वयक व समूह समन्वयक) यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रभावी संवाद हा अभियानाचा आत्मा आहे. स्वच्छता ही लोकचळवळ बनवावी, शौचालयाचा नियमित वापर, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टीकबंदी याद्वारे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत होणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीत प्रभावी स्वच्छता केल्यास कोरोना नियंत्रण येण्यास मदत होईल, असा विश्वास डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केला.

लोकप्रतिनिधींनी यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन करतानाच, स्वच्छतेत नावीन्यपूर्ण उपक्र म राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्था, व्यक्ती, एनएसएस व नेहरू युवा केंद्र आदींचे या स्वच्छता उपक्र मासाठी योगदान महत्त्वाचे ठरणार असून, हे अभियान गावस्तरावर सरपंच व ग्रामसेवक यांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेऊन यशस्वी करावे, असेही डॉ.किरण पाटील म्हणाले. टोल फ्री क्र मांक १८००१८००४०४ वर स्वच्छाग्रही व नागरिकांनी प्रतिसाद नोंदवावा, तसेच ग्रामपंचायत स्तरावर १५ आॅगस्ट रोजी ग्रामस्थांना कोविड १९च्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून स्वच्छतेची शपथ व इतर उपक्र म राबविण्याचे आवाहन डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.

अभियानांतर्गत उपक्रम : या अभियानांतर्गत ९ आॅगस्ट रोजी ग्रामस्तरावर सिंगल युज प्लास्टीकचे संकलन व वर्गीकरण, १० आॅगस्ट रोजी ग्रामपंचायत व सार्वजनिक परिसरातील इमारतीमध्ये श्रमदान मोहीम राबविणे, ११ आॅगस्ट रोजी गावातील भिंतीवर स्वच्छता संदेश रंगविणे, १२ आॅगस्ट रोजी वृक्षारोपणाचे उपक्रम राबविणे, १३ आॅगस्ट रोजी ‘गंदगीमुक्त माझे गाव’ या विषयावर आॅनलाइन चित्रकला स्पर्धा (इयता सहावी ते आठवी), तसेच याच विषयावर निबंध स्पर्धा (इयता नववी ते बारावी), १४ आॅगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, १५ आॅगस्ट रोजी ओडीएफ प्लस कार्यक्र माची घोषणा करणे हे उपक्रम राबविण्यात यावेत.

Web Title: Participate in the 'Dirt Free India' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.