अलिबाग: मांडवा बंदरात आज सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास अजंठा कंपनीची प्रवासी बोट बुडाली. बोटीमध्ये 88 प्रवासी प्रवास करत होते. पोलिसांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या बोटीने 80 जणांना वाचवले. तर अन्य 8 जणांना खासगी बोटीने वाचवण्यात यश आले आहे.गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून सकाळी 9 वाजता अल फथेह बोट सुटली होती. मांडावा बंदरा जवळ 200 मीटर अंतरावर असताना बोट बुडू लागली. बोटीला खाली दगड लागल्याने ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. बोट बुडू लागताच त्यातील प्रवासी घाबरले. सद्गुरू कृपा या बोटीतून पेट्रोलिंग करणारे पोलीस तातडीने बुडणाऱ्या बोटीतील प्रवाशांच्या मदतीसाठी धावले. त्यांनी बोटीतील 80 जणांना वाचवले. तर अन्य 8 प्रवाशांना खासगी बोटीने सुखरूप मांडावा बंदरावर उतरवले.
ब्रेकिंग! मांडवा बंदरात प्रवासी बोट बुडाली; सुदैवानं सर्व प्रवासी सुखरुप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 11:44 AM
पोलिसांच्या पेट्रोलिंग टीमनं वाचवले 80 प्रवाशांचे प्राण; सर्व प्रवासी सुखरुप
ठळक मुद्देपोलिसांच्या पेट्रोलिंग टीमनं ८० जणांचा जीव वाचवलाखासगी बोटीच्या माध्यमातून ८ जणांची सुटकासकाळी १० च्या सुमारास अपघात