नांदगाव/ मुरूड : मुरूड आगारातून मुंबई, ठाणे, शिर्डी, धुळे, बोरीवली आदी लांब पल्ल्याच्या गाड्या सुटत असतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक गाडी दीड ते दोन तास उशिराने सुटत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. मुरूड आगारातून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसाला चार हजारच्या वर आहे. प्रत्येक गाडी उशिराने सुटल्याने शालेय विद्यार्थी शाळेत उशिराने पोहोचत आहेत. प्रवासी रोज गाड्या उशिराने सुटत असल्याने त्रस्त झाले आहेत.गुरुवारी मारुती नाका येथे राहणारे अमोल शेडगे हे बसथांब्यावर सकाळी नऊ वाजता उभे होते. ९:३० वाजता सुटणारी मुरूड-बोरीवली गाडी १०.३० वाजले तरी न आल्याने अखेर ते वैतागून आगाराच्या मुख्य ठिकाणी पोहोचले. त्यांनी कंट्रोल रूमकडे चौकशी केली असता त्यांना सहा गाड्या दुरुस्तीसाठी काढलेल्या असून त्यामुळे गाडी उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले. तदनंतर आगार व्यवस्थापक तुषार गायकवाड यांना भेटून कैफियत मांडली. त्यांनीसुद्धा गाड्या दुरुस्तीसाठी काढल्यामुळे गाड्या उपलब्ध नसल्याचे सांगितले. प्रवाशांनी संताप व्यक्त केल्यावर त्यांनी एक अलिबाग गाडी सोडली. (वार्ताहर)मुंबई येथून मुरु डकडे येणाऱ्या गाड्या वेळेत पोहचत नाहीत. पावसाने विश्रांती घेतल्याने महामार्गावर खड्डे दुरु स्त करण्याचे काम सुरु आहे. तर काही ठिकाणी नवीन रस्ता हि बनविला जात आहे, अशा वेळी वाहतूक काही वेळासाठी थांबवली जात आहे. त्याचाच परिणाम गाड्या उशिराने मुरु ड आगरात पोहचत आहेत. - तुषार गायकवाड, आगारव्यवस्थापक, मुरूड
मुरूड आगारातील गाड्या उशिरा सुटल्याने प्रवासी त्रस्त
By admin | Published: August 19, 2016 1:34 AM