बोर्ली स्थानकातील गैरसोयींनी प्रवासी त्रस्त
By Admin | Published: January 28, 2017 02:54 AM2017-01-28T02:54:12+5:302017-01-28T02:54:12+5:30
मुरु ड : मुरु ड तालुक्यातील बोर्ली स्थानकातील विविध भेडसावणाऱ्या गैरसोयींमुळे प्रवासीवर्गासहित नागरिक त्रस्त झाले आहेत.
बोर्ली-मांडला / मुरु ड : मुरु ड तालुक्यातील बोर्ली स्थानकातील विविध भेडसावणाऱ्या गैरसोयींमुळे प्रवासीवर्गासहित नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र याकडे संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रवासी वर्गात नाराजीचा सूर पसरला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुरु ड तालुक्यातील काशिद, मुरु ड या ठिकाणी पर्यटकांची येणारी संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. बोर्ली स्थानकात पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. स्थानक हे नागरिकांसाठी आणि वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
मुरु ड तालुक्यातील काशिद, मुरु ड या ठिकाणी पर्यटकांची येणारी संख्या ही मोठी आहे. बोर्ली स्थानकात मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे त्या परिसरातील रस्त्यावर वाहन चालविणे धोक्याचे बनत चालले आहे. त्याचप्रमाणे बोर्ली स्थानकांत प्रवाशांना पिण्यासाठी साधी पाण्याची आणि मुतारीची सुद्धा व्यवस्था नाही. त्यामुळे प्रवासीवर्गाला पाणी पिण्यासाठी नाइलाजस्तव आजूबाजूला असणाऱ्या उपाहारगृहाचा आधार घ्यावा लागत आहे. बोर्ली येथे तिकीट खिडकीवर आरक्षणासाठी केवळ चार जागाच राखीव ठेवल्या जात आहेत. जास्त राखीव तिकीट हवे असल्यास प्रवाशी वर्गाला तिकीट खरेदीसाठी एकतर मुरु ड किंवा रेवदंडा येथे जावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचा पैसा आणि वेळ वाया जात आहे, तर बोर्ली येथील तिकीट खिडकीच्या बाजूला असलेला दुकानदार हा त्याच्या दुकानातील माल सुटीच्या दिवशी त्या खिडकीच्या समोर ठेवत असल्यामुळे एसटीचे वेळापत्रक झाकले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना वेळापत्रक बघता येत नाही. (वार्ताहर)