आविष्कार देसाई।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : शेकापला विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत, त्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले आहेत. एकेकाळी रायगड जिल्ह्यात श्रमिक मुक्ती दलाचे सर्वेसर्वा डॉ. भारत पाटणकर यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलने केली होती. त्या वेळी शेकापने डॉ. भारत पाटणकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता त्याच श्रमिक मुक्ती दलाची मदत घेण्याची वेळ शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्यावर आली आहे. तर दुसरीकडे विरोध करणाºया शेकापला श्रमिक मुक्ती दलाने काही अटींवर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे राजकारणात कोण कोणाचा कायम शत्रू नसतो आणि मित्रही नसतो, हेच यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
भाजप आणि शिवसेना यांच्यासाठी विधानसभेची निवडणूक महत्त्वाची आहे, तशीच परिस्थिती शेकापसाठी झाली आहे. त्यांचे विशेष लक्ष हे अलिबाग विधानसभेतील उमेदवार सुभाष पाटील यांना निवडून आणण्याकडे लागले आहे. कुटुंबातील उमेदवार दिल्याने त्यांना दुसऱ्यांदा निवडून आणणे शेकापसाठी जिकिरीचे झाले आहे. शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांनीही शेकापपुढे आव्हान उभे केले आहे. मतदारसंघात परिवर्तन करण्याचे आवाहन ते मतदारांना करत आहेत. यासाठी त्यांनी शेकापच्या विरोधात चांगलेच रान पेटवले आहे. दोन्ही उमेदवांराकडून प्रचारात कोणतीच कसर ठेवली नाही.दोन्ही तुल्यबळ उमेदवार असल्याने कोण बाजी मारणार याची समिकरणे मांडणे कठीण जात आहे. शेकापला ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे शेकापसाठी एक-एक मत महत्त्वाचे असल्याने कोणतीच चूक होऊ नये यासाठी स्वत: शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी रणनीती आखली आहे. यासाठी सर्व सामाजिक संघटनांचीही ते मदत घेत आहेत. श्रमिक मुक्ती दलाचे जिल्ह्यात प्रामुख्याने अलिबाग तालुक्यामध्ये कार्य आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने त्यांच्याशी जोडले गेले आहेत. त्याचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी जयंत पाटील यांनी तयारी केली आहे.
सातारा येथे काही महिन्यांपूर्वी बैठक झाली होती. त्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित होते. जातीयवादी आणि फॅसिस्ट धोरण राबवणाºया सरकारला रोखण्यासाठी एकत्र येण्याचा निर्धार त्या बैठकीमध्ये करण्यात आला होता. यासाठी एकमेकांची मदत घेण्याचेही त्या वेळी ठरले होते. त्यानंतर श्रमिक मुक्ती दलाने काही अटींवर शेकापला मदत करण्याचे मान्य केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने पक्के संरक्षक बंधारे बांधणे, आंबा खारे प्रकल्पातील पाणी खारेपाटासह उर्वरित तालुक्यांसाठी मिळवणे, पटणी कम्युटरसारख्या खासगी कंपन्यांनी संपादित केलेली आणि वापराविना पडून असलेली शेतजमीन परत मिळवणे, उघड्यांची दुरुस्ती करणे, खारभूमी नापीक क्षेत्रास नुकसानभरपाई मिळवणे, सामाजिक कामासाठी आमदार निधी देणे या अटींचा समावेश होता.सहकार्यासाठी वचनबद्धच्आमदार जयंत पाटील यांनी १६ आॅक्टोबर रोजी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांना पत्र लिहिले आहे. फॅसिस्ट धोरण राबवणाºया विद्यमान सरकारचा पराभव करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलासह सर्व पुरोगामी शक्तींनी एकवटण्याची गरज आहे.च्त्यासाठी आपण सहकार्य दिल्याबाबत आभार. कष्टकरी वर्गाच्या अनेक प्रश्नां विषयी गेली काही दशके आपण कृतिशील आहातच. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शेकापदेखील आपल्यासह प्रसंगी कृतिशील सहकार्यासाठी वचनबद्ध आहे, अशा आशयाचे पत्रच आमदार पाटील यांनी डॉ. भारत पाटणकर यांना लिहिले आहे.सुरुवातीला आमच्या आंदोलनाच्या बाबत कोणीच गंभीर नव्हते. आंदोलन उभारुन कायदेशीरपणे निर्णय शेतकºयांच्या बाजूने आता लागले आहेत. याची प्रचिती सर्वांनाच झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात विरोध झाला होता. त्यामुळे आमच्या लढाईला आता राजकीय पक्ष बळ देणार आहे. त्यामुळे बरेचशे प्रश्न मार्गी लागतील. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे लेखी वचन दिले आहे.-डॉ. भारत पाटणकर (श्रमिक मुक्ती दल)