अलिबाग : घारापुरी बेटातील पथदिवे तत्काळ सुरू करावे, तसेच सौरऊर्जेतून वीजपुरवठा करण्याबाबत तरतूद करावी, असे निर्देश रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी दिले. बेटावर पथदिवे लावण्यात आले असले तरी वीजबिलाचा खर्च ग्रामपंचायतीला परवडणारा नाही. त्यामुळे रस्त्यावरील दिव्यांचे बिल भरता येत नाही, याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. मुंबई विद्यापीठाच्या रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित उपकेंद्रासाठीही प्रस्ताव आल्यानंतर तत्काळ जागा उपलब्ध करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
रायगड जिल्हा नियोजन विकास समितीची (डीपीडीसी) बैठक नुकतीच संपन्न झाली. बैठकीत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी घारापुरी बेटावरील पथदिव्यांकडे लक्ष वेधले. घारापुरी बेटावर वर्षभर देश-विदेशातील पर्यटकांची वर्दळ असते. बेटावर पथदिवे लावण्यात आले असले तरी वीजबिलाचा खर्च ग्रामपंचायतीला परवडणारा नाही. त्यावर पालकमंत्री चव्हाण यांनी तातडीने जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांना कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. घारापुरी बेटावर सौरऊर्जेतून विजेसाठी प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले. राज्य उच्च शिक्षण व विकास परिषदेने शैक्षणिक आराखड्यात रायगड जिल्ह्यात मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे आगामी काळात रायगड जिल्ह्यात उपकेंद्र सुरू होईल. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने जागा तयार ठेवण्याची मागणी आमदार डावखरे यांच्याकडे केली. जिल्ह्यातील वाढत्या कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेऊन तालुकानिहाय कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासंदर्भात जिल्हाधिकाºयांना एजन्सी नियुक्त करण्याचे आदेश मागील डीपीडीसी बैठकीत देण्यात आले होते. त्याबाबत सद्यस्थिती काय आहे, असा प्रश्न आमदार डावखरे यांनी उपस्थित केला.धूपप्रतिबंधक बंधाºयांबाबत मंत्रालयात बैठकच्किनारा नियमन क्षेत्र (सीआरझेड) २०१८ च्या नव्या नियमांनुसार जिल्ह्यात रखडलेल्या धूपप्रतिबंधक बंधाºयाची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली. ती पालकमंत्री चव्हाण यांनी मान्य केली. तसेच या संदर्भात मंत्रालयात लवकरच बैठक घेण्यात येईल, बंधाºयांच्या कामांसाठी निधी मंजूर केला जाईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.