शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सुनील तटकरेंच्या विरोधात धैर्यशील पाटील शड्डू ठोकणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 10:53 AM

रायगडवर ताबा मिळविण्यासाठी भाजपची आक्रमक व्यूहरचना

जमीर काझी, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: पक्षाच्या चिन्हावर राज्यातील जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे ‘टार्गेट’ निश्चित करताना भाजपने रायगड लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यासाठीच्या पक्षविस्ताराचा भाग म्हणून शेकापचे पेण येथील माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हाती दोन महिन्यांपूर्वी ‘कमळ’ दिले आहे. लोकसभेच्या लढाईत विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात भाजपकडून त्यांना मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होण्याची शक्यता आहे. 

रायगडमधून शिवसेनेच्या अनंत गीते यांनी देशाच्या संसदेत दोनवेळा प्रतिनिधित्व करताना काहीकाळ मंत्रिपदही भूषविले होते. २०१९ मध्ये तटकरे यांनी त्यांची विजयाची हॅट्ट्रिक रोखली होती. शिवसेनेतील फुटीनंतर गीते हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. 

महाविकास आघाडीच्या फाॅर्म्युल्यानुसार सध्याची जागा ज्या त्या पक्षासाठी सोडण्याचे निश्चित असल्याने महाविकास आघाडीतर्फे सुनील तटकरे हेच उमेदवार असतील, हे निश्चित आहे. भाजपने गेल्या ६-७ महिन्यांत जिल्ह्यातील राष्ट्रवादी, शेकाप, ठाकरे गट व काँग्रेसमधील नेत्यांना पक्षात घेण्याचा धडाका लावला आहे. त्यातूनच मार्चच्या पहिल्या आठवड्यात पेणमधील माजी आमदार धैर्यशील पाटील यांचाही पक्षप्रवेश झाला. शिवसेनेतील फुटीनंतर भाजपने सर्वप्रथम खा. तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांना पक्षात घेतले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला अध्यक्ष गीता पालेरचा, शेकापचे दिलीप भोईर यांच्यासह अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

पेण विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा लाल बावटा फडकविलेल्या धैर्यशील पाटील यांना २०१९ मध्ये पराभवाचा फटका बसला. तेव्हापासून त्यांच्या राजकारणाची दिशा बदलत चालली होती. त्यांची नाराजी लक्षात घेऊन शेकापकडून पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन वडखळला भरवून त्यांना मान देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, तो असफल ठरला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने तेथे लोकसभेला तेच उमेदवार असतील. त्यामुळे रायगड मतदारसंघातून भाजप आपला उमेदवार देणार, हे निश्चित आहे. त्यासाठी धैर्यशील पाटील यांना संधी दिली जाईल, असे मानले जाते. पाटीलच्या ‘इनकमिंग’मुळे पेणमधील पक्षाचे आमदार रवींद्र पाटील यांचीही अडचण दूर झाली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात पेण, अलिबाग, महाड, श्रीवर्धन, दापोली आणि गुहागर या विधानसभेच्या सहा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यापैकी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येकी दोन आमदार शिंदेंच्या गटात आहेत, तर श्रीवर्धन व पेण मतदारसंघांत अनुक्रमे राष्ट्रवादी व भाजपचा आमदार आहे. 

शेकापची भूमिका महत्त्वाची ठरणार

महाविकास आघाडीत दोन्ही काँग्रेस, शिवसेना व शेकापचा समावेश असला तरी २०१९च्या विधानसभा निवडणुकीत तटकरेंकडून फारसे सहकार्य न मिळाल्याने शेकापचे जयंत पाटील व त्यांच्यातून विस्तव जात नाही. त्यामुळे आघाडीत राहूनही शेकापची तटकरे यांना कितपत मदत होईल, याची शाश्वती नाही. उलट धैर्यशील पाटील यांच्याबद्दल शेकपला सहानुभूती असेल, असे गणित भाजपकडून मांडले जात आहे. 

मतांचे गणित होते कसे?

२०१९च्या निवडणुकीत तटकरे यांना ४ लाख ८६ हजार ९६९ मते, तर गीते यांना ४ लाख ५५ हजार ५३० मते मिळाली होती. २०२४ च्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या निष्ठावंत सैनिकांची मते मिळाली, तर तटकरेंसाठी ते दिलासादायक असेल. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे विजयाचे गणित शेकाप आणि नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराने बिघडवले होते. त्यावेळी विजयी झालेले शिवसेनेचे अनंत गीते यांना ३,९६,१७८ मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना ३,९४,०६८ मते मिळाली. सुनील तटकरे असे नाव असलेल्या अपक्ष उमेदवाराला ९,८४९ मते मिळाली होती. शेकापचे उमेदवार भाई रमेश कदम यांना १,२९,७३० मते मिळाली.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाRaigadरायगड